23 November 2019 8:11 AM
अँप डाउनलोड

राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात; किरकोळ दुखापत

Raj Thackeray, Sharmila Thackeray, Sanpada, Singnal

तुर्भे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात झाल्याचं वृत्त आहे. अपघातग्रस्त गाड्यांमध्ये राज यांच्या पत्नी शर्मिला यांच्या कारचाही समावेश आहे. अपघातात शर्मिला ठाकरे यांना मुका मार लागला आहे तर, चालकासह अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. ठाकरे कुटुंब एकवीरा देवीचं दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला.

अपघातावेळी शर्मिला ठाकरेंसोबत राज यांची बहिण आणि त्यांचे सचिव सचिन मोरे कारमध्ये होते. अचानक एक रिक्षा कारसमोर आल्यानं शर्मिला यांच्या कारला अपघात झाला. रिक्षा आणि कारची धडक होऊ नये यासाठी कार चालकानं गाडी वळवली. त्यावेळी कारवरील नियंत्रण सुटलं. मात्र सुदैवानं मोठा अपघात टळला. या अपघातात शर्मिला ठाकरे यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. त्याआधी त्यांनी लोणावळा या ठिकाणी जाऊन एकवीरा देवीचे दर्शन घेतलं. लोणावळा येथे असलेली एकवीरा देवी ही ठाकरे घराण्याचे कुलदेवता आहे. त्यामुळे या देवीच्या दर्शनासाठी राज ठाकरे गेले होते. त्यांच्या गाड्यांचा ताफा परतत असताना त्यांची पत्नी म्हणजेच शर्मिला ठाकरे ज्या कारमध्ये बसल्या होत्या त्या कारला अपघात झाला. राज ठाकरे यांच्या ताफ्यात असलेल्या आणखी दोन कारनाही अपघात झाला. एका मराठीवृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(478)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या