5 May 2024 9:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

कर्जत-जामखेड | राम शिंदे समर्थक नामदेव राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

Karjat Jamkhed constituency

कर्जत-जामखेड, १८ सप्टेंबर | कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून रोहित पवार आमदार झाले आणि स्थानिक पातळीवर राम शिंदे यांच्या एकूण राजकारणाला उतरती कळा लागली आहे. त्यात राम शिंदे यांना अजून एक राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण कर्जत नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष आणि नगरसेवक नामदेव राऊत यांनी प्राथमिक आणि सक्रीय सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.

कर्जत-जामखेड, राम शिंदे समर्थक नामदेव राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार – Karjat Jamkhed constituency Ram Shinde’s supporter Namdev Raut will join NCP in presence of MLA Rohit Pawar :

दरम्यान, नामदेव राऊत हे लवकरच आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचेही वृत्त आहे. यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे संघटन सरचिटणीस प्रसाद बापूसाहेब ढोकरीकर यांनीही पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिंदे यांना हा दुसरा मोठा झटका मानला जातोय. नामदेव राऊत यांनी भाजपात विविध पदावर (Ram Shinde’s supporter Namdev Raut) काम करत शेवगाव पालिकेसाठी पक्ष निरिक्षक म्हणुन काम केलेले आहे. यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपाला चांगलाच धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नामदेव राऊत हे माजी मंत्री राम शिंदे आणि खासदार सुजय विखे-पाटील यांचे खंदे समर्थक मानले जात होते. मात्र, राऊत हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवारांच्या या खेळीमुळं राम शिंदे यांनी सुजय विखे-पाटील यांना हा मोठा धक्का असणार आहे. राऊत यांच्या मागे कर्जत शहरातील मोठी ताकद असल्याचं मानलं जातं. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत शिंदे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Karjat Jamkhed constituency Ram Shinde’s supporter Namdev Raut will join NCP in presence of MLA Rohit Pawar.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x