4 May 2024 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा
x

Punjab Congress Crisis | मुख्यमंत्री करायचा तर माझ्याच गटाचा करा, अन्यथा बहुमत चाचणीला तयार राहा - अमरिंदर सिंग

Punjab Congress crisis

चंदीगड, १९ सप्टेंबर | कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काल राज्यपालाकडे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पंजाब राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. राज्यातील काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, पक्षश्रेष्ठींनी आपल्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केल्याने आपल्याला आपण राजीनामा दिल्याचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग म्हणाले होते.

Punjab Congress Crisis, मुख्यमंत्री करायचा तर माझ्याच गटाचा करा, अन्यथा बहुमत चाचणीला तयार राहा – Amarinder Singh warn to congress high command to make chief minister from my supporters otherwise be ready for floor test :

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या राजीनाम्याची खापर काँग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर फोडली आहे. राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मला फोन करुन सॉरी म्हणाल्या असा दावा देखील अमरिंदर सिंग यांनी केला आहे. कॅप्टनने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला होता.

दरम्यान, पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर काँग्रेसकडून चर्चा सुरू असतानाच आता कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दंड थोपाटले आहेत. मुख्यमंत्री करायचाच असेल तर तो माझ्या गटातील करा. नाही तर बहुमत चाचणीसाठी तयार राहा, असा इशाराच अमरिंदर सिंग यांनी हायकमांडला दिला आहे. त्यामुळे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचा तिढा आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना फोन करून हा इशारा दिल्याचं सांगितलं जात आहे. माझ्या समर्थक आमदाराला मुख्यमंत्री नाही केलं तर फ्लोअर टेस्टला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असं सिंग यांनी हायकमांडला सांगितल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याची निवड करणं काँग्रेससाठी डोकेदुखी झाली आहे

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Amarinder Singh warning to congress high command regarding floor test.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x