मुंबई, २० सप्टेंबर | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत नव्यानव्या विधानांमुळे चर्चेत असतात. पुण्यात बोलताना त्यांनी केलेल्या एका नव्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात स्फोट होणार असल्याचे जणू त्यांनी संकेतच दिले होते.

माजी चे आजी मंत्री होणार या चंद्रकांत पाटलांच्या भविष्यवाणीचे काय झाले? | दादांना शुभेच्छा कशा द्याव्यात? – Congress spokesperson Sachin Sawant taunt Chandrakant Patil over his statement regarding former minister :

तर आज चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपच्या रडारवरील हे दोन नेते कोण? असा सवाल केला जात असून तर्कवितर्क लढवले जात आहेत.’

मात्र काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं की, ‘काँग्रेस नेत्यांचे भ्रष्टाचार काढणार या नवीन भविष्यवाणीआधी, ७२ तासात “माजी”चे “आजी” मंत्री होणार या चंद्रकांत पाटील यांच्या भविष्यवाणीचे काय झाले? देशात आज कुठेच कोणाचा शपथविधी झालेला दिसत नाही. आम्ही दादांना शुभेच्छा कशा द्याव्यात? कोविडमुळे राज्यात तसेही नाटक सिनेमा बंद आहेत

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Congress spokesperson Sachin Sawant taunt Chandrakant Patil over his statement regarding former minister.

2 दिवसात माजी चे आजी मंत्री होणार या चंद्रकांत पाटलांच्या भविष्यवाणीचे काय झाले? | दादांना शुभेच्छा कशा द्याव्यात? – सचिन सावंत