4 May 2024 8:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

ममता प. बंगालमध्ये भाजपला भुईसपाट करतील अशी भीती? | प. बंगाल भाजपमध्ये अचानक पक्षांतर्गत खांदेपालट

CM Mamata Banerjee

कोलकाता, २१ सप्टेंबर | पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भवानीपूर मधील पोटनिवडणूक जवळ आली असताना भाजपने राज्य पातळीवर संघटनात्मक मोठा बदल केला आहे. प्रदेशाध्यक्षपदी सुकांत मुजुमदार यांची निवड करण्यात आली असून पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांची बढती देऊन त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. भाजपमधून होणारी पडझड रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ममता प. बंगालमध्ये भाजपला भुईसपाट करतील अशी भीती?, भाजपमध्ये अचानक पक्षांतर्गत खांदेपालट – Changes in West Bengal BJP to prevent fall Sukant Mujumdar State President and Dilip Ghosh National Vice President :

दोन्ही नेत्यांनी आपापल्या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले असून नवी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्याची ग्वाही पक्षश्रेष्ठींना दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे नाव पाच वर्षांपूर्वी कुणी घेतही नव्हते. आज भाजपची राजकीय ताकद तृणमूल काँग्रेसच्या बरोबरीची झाली आहे.

भाजप आज जरी विरोधी पक्षात बसला असला तरी मतांच्या टक्केवारीत पक्षाने तृणमूल काँग्रेसला जबरदस्त टक्कर दिली आहे. गेल्या पाच वर्षातला माझा अनुभव सकारात्मक आहे. या अनुभवातूनच पक्षाने मला राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे, असे दिलीप घोष यांनी पत्रकारांना सांगितले.

तर सुकांत मुजुमदार यांनी यावेळी नवी जबाबदारी स्वीकारताना पुढच्या पाच वर्षात तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी कठोर मेहनत घेण्याची ग्वाही दिली आहे. बंगालमध्ये येत्या वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत पासून महापालिकेपर्यंत महत्त्वाच्या निवडणूका आहेत. तेथे तृणमूल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करेल. आणि तो तृणमूळ काँग्रेसवर मात करून दाखवेल, असा विश्वास सुकांत मुजुमदार यांनी व्यक्त केला आहे.

भाजपमधून एकापाठोपाठ एक नेते तृणमूल काँग्रेसमध्ये चाललेले असताना भाजपने आपल्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास भरण्यासाठी हा बदल केल्याचे बोलले जात आहे. सुकांत मुजुमदार आता पश्चिम बंगालचा राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. यामध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Changes in West Bengal BJP to prevent fall Sukant Mujumdar State President and Dilip Ghosh National Vice President.

हॅशटॅग्स

#WestBengalAssemblyElection2021(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x