28 March 2023 2:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Khadim India Share Price | या कंपनी व्यवस्थापनतील फेरबदलांमुळे हा शेअर फोकसमध्ये आला, गुंतवणूक करावी का? Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या
x

हे 5 कृषिसंबंधित व्यवसाय करून शेतकरी कमवू शकतात भरपूर कमाई - वाचा सविस्तर

Agriculture business ideas

मुंबई, १९ जून | शेतकऱ्यांचा संबंध थेट निसर्गाशी असल्याने पाऊस, दुष्काळ, पूर अशा नैसर्गिक संकटांचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत असतो. पीक नष्ट झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. मात्र आता शेतकऱ्यांसाठी कृषि संबंधित व्यवसायाचे अनेक पर्याय समोर आले आहेत. या व्यवसायांसदर्भात जाणून घेऊया.

सेंद्रिय फार्म ग्रीनहाऊस:
सध्या सेंद्रिय पद्धतीने विकसित केलेल्या गोष्टींसाठी बरीच मागणी आहे. कारण खाद्य पदार्थ रसायने आणि खतांनी बनवतात, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. म्हणून, लोक अधिक प्रमाणात सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले पदार्थ वापरतात. आपण सेंद्रिय पद्धतीने खाद्यपदार्थांचे उत्पादन करुन स्वत: चे सेंद्रीय फार्म ग्रीनहाऊस सुरू केल्यास आपल्याला याचा मोठा फायदा होईल. याशिवाय तुम्ही सेंद्रीय फूड स्टोर उद्योग देखील सुरू करू शकता.

फुलांचा व्यवसाय:
फुलांचे उत्पादन खूप लवकर होत असते. लोग लग्न किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमात सजावटीसाठी विविध प्रकारच्या फुलांचा उपयोग करतात. त्यामुळे फुलांची बाजारात नेहमीच मागणी असते. तुम्ही विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन करून बाजारात त्याची विक्री करू शकता. फुलांचे दुकान देखील तुम्ही सुरू करू शकता.

कुक्कुटपालन:
पशूपालन संबंधित व्यवसाय सुरू करून पैसे कमविण्याची चांगली संधी आहे. कुक्कुटपालन हा पर्याय देखील चांगला आहे. कारण लोक कोंबडीचे मांस आणि अंड्यांचे कोणत्याही काळात सेवन करत असल्याने याची मागणी सतत सुरू असते. खाद्य उत्पादन कंपन्यांना देखील कोंबड्या विकता येतात. मत्स्य व्यवसाय देखील अत्यंत फायदेशीर आहे, केंद्र सरकारही यात मच्छीमारांना मदत करत आहे.

सूर्यफूलाची शेती:
हा देखील शेतीशी संबंधित व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना याद्वारे चांगले उत्पन्न मिळू शकते. मात्र यासाठी अधिक जमिनीची आवश्यकता असते. याला कमर्शियल कॅश क्रॉप म्हटले जाते. मात्र या व्यवसायाला सुरू करण्यासाठी गुंतवणूक करावी लागते. सरकारच्या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

शैक्षणिक शेती:
या व्यवसायासाठी तुमच्याकडे कृषि संदर्भात सर्व माहिती, ज्ञान असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे शेती संदर्भात गोष्टी जसे की, जमीन बियाणे, तंत्रज्ञान, खत अशा गोष्टींची माहिती असल्यास तुम्ही इतरांना देखील ज्ञान प्रदान करू शकता. विद्यार्थ्यांना या संदर्भा माहिती देऊन तुम्ही चांगली कमाई करू शकता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Agriculture business ideas for farmers news updates.

हॅशटॅग्स

#Agriculture(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x