28 April 2024 3:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Actress Mrunmayee Deshpande Biography | अभिनेत्री मृण्मयी देशपांडे बद्दलची 'ही' माहिती जाणून घ्या

Actress Mrunmayee Deshpande Biography

मुंबई, २२ सप्टेंबर | या लेखातमध्ये आपण Marathi Actress Mrunmayee Deshpande यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही प्रामुख्याने हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे चला तर जाणून घेऊया अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे बद्दलची ‘ही’ माहिती जाणून घ्या – Actress Mrunmayee Deshpande Biography in Marathi :

Mrunmayee Deshpande Birthday Age Education:
Marathi Actress Mrunmayee Deshpande यांचा जन्म 29 मे 1988 ला पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी आपले शालेय शिक्षण रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल पुणे मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण एस पी कॉलेज (सर परशुरामभाऊ कॉलेज) मधून पूर्ण केलेले आहे.

Mrunmayee Deshpande Serial Movie:
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

मालिका – Serial:
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी मालिकांपासून केली वर्ष 2007 मध्ये प्रदर्शित झालेली स्टार प्रवाह या वाहिनीवरील मालिका ‘अग्निहोत्र’ ही त्यांची पहिलीच मराठी मालिका होती या मालिकेमध्ये त्यांनी सही नावाची भूमिका केली होती.

झी मराठी कुंकू:
वर्ष 2012 मध्ये प्रदर्शित झालेली झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘कुंकू’ यामध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी जानकी नावाची भूमिका केली होती.

Actress-Mrunmayee-Deshpande-information-in-Marathi

Mrunmayee Deshpande Reality Show:
मराठी मालिका सोबतच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी काही टीव्ही रियालिटी शोचे अंकेरिंग सुद्धा केलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने “युवा सिंगर एक नंबर, सा रे ग म प मराठी लिटिल चॅम्प, कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि झी महाराष्ट्र कुस्ती दंगल” यासारख्या टीव्ही रिॲलिटी शोचं अँकरिंग केलेले आहे.

Mrunmayee Deshpande Marathi/Hindi Movies:
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी मराठी मालिकेनंतर मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली.

* वर्ष 2007 मध्ये प्रदर्शित झालेला it’s breaking news हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता.
* वर्ष 2009 मध्ये प्रदर्शित झालेला एक कप चाय या चित्रपटांमध्ये त्यांनी वासंती सावंत नावाची भूमिका केली होती.
* वर्ष 2012 मध्ये प्रदर्शित झालेला मोकळा श्वास यामध्ये त्यांनी मुख्य भूमिका केली.
* वर्ष 2012 मध्ये संशयकल्लोळ या चित्रपटांमध्ये त्यांनी श्रावणी नावाची भूमिका केली होती.
* 2013 मध्ये त्यांनी Dham Dhoom या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता
* याच वर्षी त्यांचा नवरा माझा भवरा या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता
* आंधळी कोशिंबीर या चित्रपटांमध्ये त्यांनी राधिका नावाची भूमिका केली होती.
* 2014 मध्ये त्यांनी पुणे विया बिहार या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका केली होती.
* 2014 मध्ये त्यांनी सता लोटा पण सगळं खोटा या चित्रपटांमध्ये त्यांनी वासंती नावाची भूमिका केले होते.
* 2014 मध्ये त्यांनी मामाच्या गावाला जाऊया या चित्रपटामध्ये मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकर यांच्यासोबत अभिनय केला होता.
* वर्ष 2015 मध्ये त्यांनी स्लॅमबूक या चित्रपटांमध्ये अपर्णा नावाची भूमिका केले होती.
* वर्ष 2015 मध्ये त्यांनी मराठी मधील सर्वात सुपरहिट चित्रपट कट्यार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये त्यांनी उमा नावाची भूमिका केली होती या चित्रपटांमध्ये त्यांनी मराठी अभिनेता सुबोध भावे यांच्यासोबत अभिनय केला होता.
* वर्ष 2016 मध्ये त्यांनी गुलमोहोर नावाच्या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.
* याच वर्षी त्यांनी नटसम्राट या चित्रपटांमध्ये विद्या गणपत बेलवलकर नावाची भूमिका केली होती.
* वर्ष 2016 मध्ये त्यांनी अनुराग या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.
* 2017 मध्ये त्यांनी ध्यानी-मनी या चित्रपटामध्ये अपर्णा नावाची भूमिका केली होती तसेच याच वर्षी प्रदर्शित झालेला बेभान या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.
* वर्ष 2018 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा फर्जंद या चित्रपटांमध्ये त्यांनी केसर नावाची भूमिका केली होती याच वर्षी त्यांनी बोगदा या चित्रपटामध्ये तेजस्विनी नावाची भूमिका केली होती. तसेच त्यांनी एक राधा एक मीरा
* वर्ष 2018 मध्ये त्यांनी मराठी कॉमेडी चित्रपट शिकारी या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता या चित्रपटांमध्ये त्यांनी मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक आणि मराठी कॉमेडी सुपरस्टार भाऊ कदम यांच्या सोबत अभिनय केला होता.
* वर्ष 2019 मध्ये त्यांनी भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटांमध्ये सुंदर नावाची भूमिका केली होती. याच वर्षी त्यांनी 15 ऑगस्ट, फत्तेशिखस्त, मिस यू मिस्टर यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

Actress Mrunmayee Deshpande information in Marathi :

Mrunmayee Deshpande Hindi Movie:
मराठी चित्रपटात सोबतच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे.

Humne Jina Seekh Liya:
वर्ष 2008 मध्ये प्रदर्शित झालेला हमने जीना सीख लिया या चित्रपटांमध्ये त्यांनी परी नावाची भूमिका केली होती हा त्यांचा पहिलाच हिंदी चित्रपट होता.

The Power:
लवकरच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांचा The Power हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या चित्रपटांमध्ये त्यांनी रतना ठाकूर नावाची भूमिका केलेली आहे.

मराठी मालिका, हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी काही चित्रपटांची दिग्दर्शन सुद्धा केलेली आहे वर्ष 2020 मध्ये त्यांनी मन फकीरा या चित्रपटाचे डायरेक्शन केले होते लवकरच त्यांचा मनाचे श्लोक हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Mrunmayee Deshpande Biography Wiki:

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

Biography: Actress Mrunmayee Deshpande Biography in Marathi.

हॅशटॅग्स

#MrunmayeeDeshpande(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x