
मुंबई, २६ सप्टेंबर | १७ कॉर्पोरेट घराण्यांचा एक इक्विटीमास्टर सर्व्हे घेण्यात आला. टाटा, विप्रो आणि रिलायन्यासारख्या कंपन्या भारतात संकट काळामध्ये अनेक प्रकारे मदत देऊ करतात. कोरोना संकटकाळामध्ये टाटा ग्रुपकडून भारताला खूप मोठी मदत झाली. यासारख्या मोठ्या स्वदेशी कंपन्या कितपत विश्वासू आहेत यावर एक सर्वे करण्यात आला. त्यामध्ये लोकांनी या कंपन्यांची उत्पादने किती विश्वासू आहेत हे सांगितले आहे.
Tata group most trustworthy grou Ambanis way behind says survey :
या सर्वेमध्ये सर्वात विश्वासार्ह ग्रुप टाटा असून त्यांनी रिलायन्सला मागे टाकले आहे. टाटा ग्रुप, आदित्य बिर्ला ग्रुप आणि मुकेश अंबानी ग्रुप हे पहिल्या ३ मधे आहेत. चौथ्या पोझिशन वर राहुल बजाज ग्रुप ने स्थान मिळवले आहे. ५२७४ लोकांनी या पोलमध्ये भाग घेतला व टाटा ग्रुपला सगळ्यात जास्त मते देण्यात आली. मागच्या पोलच्या तुलनेमध्ये दुप्पट मते टाटा ग्रुपने मिळवली आहेत. २०१३ साली टाटा ग्रुपला ३२ टक्के व्होट मिळाले होते तर यावर्षी ६६ टक्के मताने टाटा ग्रुप पहिल्या पोझिशन वर आले आहेत.
इक्विटीमास्टर उपप्रमुख राहुल शाम म्हणाले की, ग्राहकांचा विश्वास आणि प्रतिष्ठा हे कंपनीसाठी खूप महत्त्वाचे असते. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला तर त्याचा फायदा हा दीर्घकालीन मिळतो. त्यामुळे सर्व कॉर्पोरेट ग्रुप्सनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करणे व प्रतिष्ठा वाढविण्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.