3 May 2024 11:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

देशात को-ऑपरेटिव्ह बँकांच्या घोटाळ्यात महाराष्ट्र देशात अव्वल | फडणवीस सरकारच्या काळात सर्वाधिक घोटाळे - RBI रिपोर्ट

Reserve Bank of India

मुंबई, २७ सप्टेंबर | राज्यात पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा गाजला आहे. मात्र हा घोटाळा काही नवीन नाही. रिझर्व बँकेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये को -ऑपरेटिव्ह बँकांचे घोटाळे मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत. देशभरात को-ऑपरेटिव्ह बँकांचे जे घोटाळे समोर आले आहेत, त्यात महाराष्ट्र अव्वल (Cooperative Bank Scams) आहे.

Maharashtra state is on top in cooperative bank scams says RBI report :

घोटाळ्यात महाराष्ट्र अव्वल:
देशभरात 1534 नागरी सहकारी बँक आहेत. त्यापैकी एक तृतीयांश बँका या महाराष्ट्रात आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार एकूण 2018 – 19 मध्ये उघडकीस आलेल्या 1193 घोटाळ्यापैकी महाराष्ट्र राज्यातील घोटाळ्यांची संख्या 856 इतकी आहे. 2019 – 20 मधील एकूण 568 घोटाळ्यांपैकी महाराष्ट्रात 386 घोटाळे समोर आले आहेत. 2020 – 21 मध्ये 323 पैकी 217 घोटाळे महाराष्ट्रात समोर आले आहे. या आकडेवारीवरून सहकारी बँकांमधील घोटाळ्यात महाराष्ट्र अव्वल असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकामध्ये समस्या अधिक:
कर्नाटक, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि उत्तराखंड येथे सर्वाधिक राजकीय पक्षांच्या सहकारी बँका आहेत. त्यापैकी महाराष्ट्र,गुजरात आणि कर्नाटकामध्ये सहकारी बँकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. बँकिंग अधिनियमात दुरुस्ती करून केंद्र सरकार राज्यांचे अधिकार हिरावून घेत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे. नागरी सहकारी बँकांना आता व्यावसायिक बँकांप्रमाणे समजले जात आहे. 277 नागरी सहकारी बँका डबघाईला आल्या आहेत. 105 सहकारी बँका किमान आवश्यक भांडवल याची पूर्तता करण्यास असमर्थ आहेत, असे आरबीआयचे म्हणणे आहे. बँकिंग नियमन अधिनियमन दुरुस्तीनुसार सहकारी बँक ताब्यात घेण्याचा निर्वाचित संचालकांना पात्रतेच्या आधारावर हटविण्याचा आणि कोणत्याही अधिकाऱ्याला हटविण्याचे अधिकार बहाल झाला आहे.

घोटाळ्यांची संख्या:
देशभरात 2018 – 19 मध्ये 1193, 2019 – 20 मध्ये 568, 2020 – 21मध्ये 323 घोटाळ्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात 2018 – 19 मध्ये 856, 2019 – 20 मध्ये 386, 2020 – 21मध्ये 217, गुजरातमध्ये 2018 – 19 मध्ये 59 , 2019 – 20 मध्ये 26, 2020 – 21मध्ये 15, कर्नाटकमध्ये 2018 – 19 मध्ये 48, 2019 – 20 मध्ये 36, 2020 – 21मध्ये 25 घोटाळ्यांची नोंद झाली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Maharashtra state is on top in cooperative bank scams says reserve bank of India report.

हॅशटॅग्स

#Reserve Bank of India(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x