21 May 2024 10:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

जनसामान्यांत प्रतिमा मलिन करण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीविरोधात भाजपचं २०१३ मधील '२G स्पेक्ट्रम' तंत्र? - सविस्तर वृत्त

Mahavikas Aghadi

मुंबई, २९ सप्टेंबर | साधारण ४ वर्षांपूर्वी 2-G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्यामध्ये ए राजा आणि कनिमोळी या दोघा मोठ्या राजकारण्याचाही समावेश होता. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ही प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, ‘या निकालातून भाजपने केलेला अपप्रचार आणि दृष्ट हेतूने उचलेला मुद्दा हा केवळ युपीए-2 च्या खोट्या बदनामीसाठीच उचलून धरला होता हे या निकालातून स्पष्ट झालं असल्याचे म्हटले होते.

It is seen that BJP has taken up ‘2G spectrum’ technics in Maharashtra. However, the Shiv Sena and the NCP, which are calm despite this, may have to face major political consequences :

भाजपकडून माध्यमांसमोर वारंवार लाखो करोडोच्या घोटाळ्याचे वारंवार आरोप:
देशाला १ लाख ७६ हजार कोटींचा फटका देणाऱ्या ‘२जी स्पेक्ट्रम’ घोटाळ्या प्रकरणी निकालात सीबीआय विशेष कोर्टाने ए राजा आणि कनिमोळी सहित सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. सीबीआय विशेष कोर्टाच्या त्या निकालानंतर मोदी सरकार मात्र तोंडघशी पडल्याचं पाहायला मिळालं होतं. कारण मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी याच घोटाळ्यावरून भाजपने काँग्रेसविरोधात आरोप करताना प्रसार माध्यमांकडे वारंवार लाखो कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि वारंवार मुद्दा उचलून काँग्रेसविरोधात मोठी वातावरण निर्मिती केली होती. आज तेच ‘२G स्पेक्ट्रम’ तंत्र भाजपने महाराष्ट्रात उपसल्याचं पाहायला मिळतंय. मात्र असतात असूनही शांत असलेल्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला याचे मोठे राजकीय परिणाम भोगावे लागू शकतात.

गेल्या दोन दिवसात शिवसेनेच्या तीन नेत्यांवर ईडी (सक्तवसुली संचालनालय) चौकशीच्या फेर्‍या सुरू आहेत. मंत्री अनंत परब, खासदार भावना गवळी आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ हे ईडीच्या रडारवर असून शिवसेना नेत्यांच्या या चौकशीमुळे ठाकरे सरकारची प्रतिमा राजकीय वर्तुळात मलिन होत का? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

नेत्यांच्या अडचणीत वाढ:
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेत्यांवर एकामागून एक आरोप केले जात आहेत. खास करून भारतीय जनता पार्टीच्या निशाण्यावर शिवसेना पक्ष रडारवर असलेला पाहायला मिळतोय. शिवसेनेचे मंत्री, नेते, आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पार्टीच्या निशाणावर असून एकामागून एक नेत्यांच्या अडचणीत वाढ होतानाच दिसते. आज शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागले आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर देखील ईडीची कारवाई झालेली पाहायला मिळाली.

सरकारची प्रतिमा जनसामान्यात मलिन करण्याचा प्रयत्न:
गेल्या दोन दिवसांमध्ये शिवसेनेच्या तीन नेत्यांवर ईडी (सक्तवसुली संचालनालय) कडून कारवाई होत असून, याचा फटका ठाकरे सरकारच्या प्रतिमेला बसताना दिसतोय. मात्र कितीही प्रयत्न करून राज्यामध्ये सत्तापालट होताना दिसत नसल्याने भारतीय जनता पार्टीने आता आरोपांच्या फेऱ्या शिवसेनेच्या नेत्यांवर सुरू केले असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी व्यक्त केले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी विरोधी पक्षाकडून अनेक प्रयत्न झाले. मात्र त्यात यश आले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधील नेत्यांवर भारतीय जनता पार्टीने आपला मोर्चा वळवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांवर आता आरोपाच्या फेऱ्यात केल्या जात आहेत. राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये याचा फटका आघाडी सरकारला बसावा आणि सरकारची प्रतिमा जनसामान्यात मलिन व्हावी, असा विरोधी पक्षाचा प्रयत्न आहे असे मत विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.

तपास यंत्रणेच्या रडारवर असलेले शिवसेनेचे नेते आणि कुटुंबीय:
अनिल परब
आनंदराव अडसूळ
प्रताप सरनाईक
रवींद्र वायकर
भावना गवळी
किशोरी पेडणेकर
यशवंत जाधव आणि यामिनी जाधव
मिलिंद नार्वेकर
रश्मी ठाकरे

अंतर्गत धुसफूस होण्याचा भाजपाला फायदा:
दररोज एका पेक्षा एक तोफा भाजपवर डागण्याऐवजी राष्ट्रवादीवर डागण्यासाठी शिवसेनेचे एकापाठोपाठ एक आमदार तयार आहेत. फक्त मुख्यमंत्री आपले आहेत म्हणून ते गप्प आहेत. पण तरीही त्यांची अस्वस्थता बाहेर आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी जितेंद्र आव्हाडांवर कोविड काळात तोफा डागून घेतल्या. विजय शिवतारे यांनी बारामतीकरांवर तोफा डागून घेतल्या. शिवसेनेची सत्ता शिवसेनेसारखी राबवा अन्यथा ते आपल्याला गिळून टाकतील, असा इशारा देऊन घेतला. ईडीच्या चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपशी जुळवून घेण्याचा शिवसेना नेतृत्वाला सल्ला दिला.

भाजपविरोधात ‘पवारांचं’ ते तंत्र ठरू शकतं ब्रह्मस्त्र:
२०१९ मधील निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि शरद पवारांविरोधात नकारात्मक वातावरण करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयोग अंगलट आला होता. त्यावेळी निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आणि ED शरद पवारांची चौकशी करणार असल्याचं वृत्त पसरलं. पण पवार ते पवारच, उद्या ईडीच्या कार्यालयात जाऊन पाहुणचार स्वीकारणार अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आणि दिल्ली हादरली. दरम्यान, पवारांना कार्यालयात घेणार नाही, असे ईडीच्या सूत्रांकडून वृत्त पसरवण्यात आल्याने ED’ची अवस्था दयनीय झाल्याचं पाहायला मिळालं आणि थेट वरिष्ठ अधिकारी पवारांना विनंती करण्यासाठी पवारांच्या घरी धडकले होते. अगदी पवारांच्या ईडी कार्यालय भेटीकडे केंद्रीय गृहमंत्रालयाची देखील दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळाले होते.

आज महाविकास आघाडीतील मंत्र्यांना काम करू न देणं हाच दिल्लीश्वरांचा अजेंडा दिसतोय. परिणामी मुख्यमंत्र्यांपासून मंत्रिमंडळातील मंत्र्यांना तसेच पवारांवर आरोप करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. तसेच अनेक मंत्र्यांना ईडीच्या नोटीस येण्याचा सपाटा लागला आहे. जर संपूर्ण ठाकरे सरकारमधील मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी ठरवून ‘पवारांचं तेच तंत्र’ उपासल्यास आणि आम्हाला लोकांची कामं करू द्या आणि एकदाची सर्वांची चौकशी करून टाका अशी भूमिका घेत ED कार्यालयाकडे एकत्र कूच केल्यास देशभर मोदी सरकारची आणि भाजपाची नाचक्की होईल असं तज्ज्ञ सांगतात. पण ED कार्यालयात धडकण्याचं जे धाडस ममतादीदी दाखवतात ते धाडस ‘ठाकरे’ दाखवतील का हा देखील प्रश्न आहे असं देखील तज्ज्ञ सांगतात. पण पवार आणि उद्धव ठाकरेंच शांत राहणं त्यांना नंतर अत्यंत अवघड राजकारणाकडे घेऊन जाईल यामध्ये देखील शंका नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: BJP using 2G Spectrum scam allegations strategy against Shivsena and NCP for making corrupt party image in mind of common peoples.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x