8 May 2024 12:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ | महागाईने तुमचा खर्च वाढणार

Petrol Diesel Price

मुंबई, 10 ऑक्टोबर | आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर कडाडल्यामुळे भारतात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price) झाली आहे. इंडियन ऑईल, HPCL आणि BPCL या भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 30 पैसे तर डिझेलच्या दरात 47 पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईत इंधनाची किंमत विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.

Petrol Diesel Price. Petrol and diesel prices have risen for the sixth day in a row in India. Indian oil companies HPCL and BPCL have hiked petrol prices by 30 paise and diesel by 47 paise. As a result, fuel prices have reached record levels in Delhi and Mumbai :

पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 110.13 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 100.76 रुपये मोजावे लागत आहेत. पुण्यात आज पेट्रोलचा दर 109.62 रुपये इतका आहे. तर डिझेलसाठी 98.63 रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय, पॉवर पेट्रोलच्या दरातही वाढ होऊन प्रतिलीटरसाठी 113.30 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 104.14 आणि 92.82 रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. मुंबईत डिझेलने शनिवारीच 100 रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडला होता. तर दिल्लीत पेट्रोलच्या दराने पहिल्यांदाच 104 रुपयांची पातळी ओलांडली आहे.

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढीचा कल आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80 च्या जवळ पोहोचली आहे. येत्या काही दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. अनेक शहरांमध्ये ते 110 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Petrol Diesel Price hike on 10 October 2021 checkout price.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x