13 December 2024 12:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Arham Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर्सवर फ्री शेअर्स मिळतील, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा

Arham Technologies Share Price

Arham Technologies Share Price | अरहम टेक्नॉलॉजी लिमिटेड या एसएमई क्षेत्रातील स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. 14 मार्च 2024 रोजी अरहम टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. ( अरहम टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनी अंश )

अरहम टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी अरहम टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 207 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अरहम टेक्नॉलॉजी ही कंपनी मुख्यतः व्यावसायिक ब्रँड्सना मूळ उपकरण निर्माता म्हणून सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी स्मार्ट टीव्हीची निर्मिती करते. मध्य भारतातील इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात या कंपनीचे उत्पादन प्रसिद्ध मानले जातात. अरहम टेक्नॉलॉजी कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

मात्र कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव संचालकांनी मंजूर करताच त्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत शेअरधारकांच्या डिमॅट खात्यात बोनस शेअर्स जमा केले जातील. कंपनीने 12 एप्रिल 2024 रोजी शेअरधारकांची सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.

अरहम टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 15 मार्च 2024 रोजी 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 197.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 166.79 कोटी रुपये आहे. अरहम टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 302.90 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 43.75 रुपये होती.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 273 टक्के परतावा कमावून दिला आहे. अरहम टेक्नॉलॉजी कंपनीचे मुख्यालय रायपूर , छत्तीसगड येथे आहे. या कंपनीचे 500 पेक्षा जास्त B2B ग्राहक आहेत. अरहम टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीची स्थापना 2013 साली झाली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Arham Technologies Share Price NSE Live 18 March 2024.

हॅशटॅग्स

Arham Technologies Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x