8 May 2024 4:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

Infosys Recruitment | इन्फोसिस चांगल्या पॅकेजसहित ४५ हजार तरुणांना रोजगार देणार

Infosys Recruitment

बंगळुरू, १५ ऑक्टोबर | भारतीय आयटी क्षेत्रातील प्रमुख सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या इन्फोसिस यंदा ४५ हजार तरुणांना रोजगार देणार आहे. कोरोना महामारीदेश आणि मुळे जगभरात डिजिटीकरणास वेग आला. त्यामुळे आयटी कंपन्यांची मनुष्यबळाची गरज वाढली आहे. कंपन्यांकडून एकमेकांच्या अनुभवी कर्मचाऱ्यांना अधिक पॅकेज देऊन (Infosys Recruitment) स्वतःकडे आकर्षित करण्याची स्पर्धा वाढली आहे.

Infosys Recruitment. Infosys, India’s leading IT company, will employ 45,000 young people this year. The Corona epidemic and its roots accelerated digitization around the world. This has increased the manpower requirement of IT companies :

विशेष म्हणजे आयटी क्षेत्रातील या तंत्रामुळे इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपनीत कर्मचारी गळतीचे प्रमाण दुसऱ्या तिमाहीत वाढून २०.१ टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे कंपनीच्या दैनंदिन कामात अडथळे निर्माण झाले आहेत. आधीच्या तिमाहीत ते १३.९ टक्के होते. कंपनीने अपेक्षित महसूलवृद्धी १४ ते १६ टक्क्यांवरून वाढवून १६.५ ते १७.५ टक्के केली आहे.

इन्फोसिसचे सीओओ यू. बी. प्रवीण राव यांनी सांगितले की, ८६ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे हायब्रीड कार्यपद्धती स्वीकारण्याची तयारी करीत आहोत. त्यात घरून आणि ऑफिसातून काम करण्याची सोय असेल. कर्मचाऱ्यांना उत्पादकता वाढविणाऱ्या साधनांनी सुसज्ज केले आहे. सायबर सुरक्षितता आणि कार्यजीवनात समताेल राहावा, असे वातावरण उपलब्ध केले आहे.

प्रवीण राव यांनी सांगितले की, बाजारातील संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, यासाठी आम्ही नवपदवीधरांच्या भरतीच्या उद्दिष्टात वाढ केली आहे. आता आम्ही ४५ हजार नवपदवीधरांची भरती करण्याचे निश्चित केले आहे. कर्मचाऱ्यांच्या सुविधांत सुधारणा करण्याची प्रक्रियाही आम्ही सुरूच ठेवणार आहोत. त्यात आरोग्यसेवा, कल्याण उपक्रम, कौशल्य विकास, सुयोग्य भरपाई हस्तक्षेप आणि वाढीव करिअर वृद्धीच्या संधी यांचा समावेश आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Infosys Recruitment the IT company will employ 45000 young people this year.

हॅशटॅग्स

#Job Alert(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x