12 October 2024 6:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

Aryan Khan Cruise Drugs Case | जुन्या व्हॉट्सअॅप चॅटचा गैरवापर केला जातोय | आर्यनचा एनसीबीवर आरोप

Aryan Khan Cruise Drugs Case

मुंबई, 23 ऑक्टोबर | क्रूझ ड्रग्ज प्रकरणात 3 ऑक्टोबरला अटक करण्यात आलेल्या आर्यन खानने मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या जामीन अर्जात म्हटले आहे की, NCB ड्रग्ज जप्त करण्याच्या प्रकरणात त्याला अडकवण्यासाठी त्याच्या जुन्या व्हॉट्सअॅप चॅटचा गैरवापर करत आहे. आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात असून त्याचा जामीन अर्ज दोनदा फेटाळण्यात (Aryan Khan Cruise Drugs Case) आला आहे. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी 26 ऑक्टोबर रोजी होणार आहे. एनसीबीने या प्रकरणात आतापर्यंत 20 जणांना अटक केली आहे.

Aryan Khan Cruise Drugs Case. I have no connection with any of the other accused except Arbaaz Merchant and Achit Kumar. The WhatsApp chats that the NCB is referring to have nothing to do with this case. Those chats are very old. Those alleged chats cannot be linked to any conspiracy :

जहाजावर छापा टाकल्यानंतर एनसीबीला माझ्याजवळ कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नाही. अरबाज मर्चंट आणि अचित कुमार वगळता इतर कोणत्याही आरोपींशी माझा संबंध नाही. व्हॉट्सअॅप चॅट्स ज्याचा उल्लेख एनसीबी करत आहे त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्या चॅट्स खूप पूर्वीच्या आहेत. त्या कथित चॅट्स कोणत्याही षडयंत्राशी जोडल्या जाऊ शकत नाहीत, ज्यासाठी गुप्त माहिती प्राप्त झाली. तपास अधिकाऱ्याने व्हॉट्सअॅप चॅट्सचा अर्थ पूर्णपणे चुकीचा आहे.

आर्यन खानने जामीन न देण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायालयाने म्हटले होते की, आर्यन प्रभावशाली आहे, त्यामुळे कोठडीतून सुटल्यावर तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो. यावर आर्यनने म्हटले आहे की ‘एखादी व्यक्ती प्रभावशाली आहे म्हणून तो पुराव्यांशी छेडछाड करेलच असे नाही.’

एनसीबीने अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमिचा यांच्यासह आर्यन खानला ३ ऑक्टोबरला अटक केली होती. सध्या तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्यन खान आणि इतर आरोपी मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहेत, तर धमिचा भायखळा महिला जेलमध्ये आहेत. नारकोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्स्टन्स अॅक्ट (एनडीपीएस) संबंधित प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी आर्यनला कटाचा भाग असल्याचे सांगून जामीन नाकारण्यात आला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Aryan Khan Cruise Drugs Case whatsapp chat history is old used by NCB.

हॅशटॅग्स

#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x