2 May 2025 10:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

कंगना स्वतः ड्रगिस्ट असल्याचं बोलत असेल तर तिची चौकशी झाली पाहिजे - भाजप

Kangana Ranaut, Inquire by NCB, BJP Leader Pravin Darekar, Marathi News ABP Maza

मुंबई, २३ सप्टेंबर : सारा अली खान, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर आणि दीपिका पदुकोण पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीचं एनसीबीच्या रडारवर नावं आली आहेत. या अभिनेत्रीचं वय जवळपास ४० वर्षे असून या अभिनेत्रीने मोठा हिट सिनेमा दिला आहे. ही अभिनेत्री २००५, २००६ च्या काळातील आहे.

NCB च्या सुत्राच्यां माहितीनुसार, अटकेत असलेल्या अनुज केशवानी आणि अंकुश या ड्रग्स पेडलर्स यांच्या चौकशीत या अभिनेत्रीचं नाव पुढे आलं आहे. या अभिनेत्रीची मॅनेजर तिच्यापर्यंत ड्रग्स पोहोचवत असेल. या अभिनेत्रीची मॅनेजर ड्रग्स पेडलर अनुजची गर्लफ्रेंड आहे.

२०१९ साली या अभिनेत्रीने ड्रग्स खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात मॅनेजरने ड्रग्स पेडलर्ससोबत दोनदा मिटिंग देखील केली होती. यामुळे येत्या काही दिवसांत अभिनेत्रीच्या मॅनेजरची चौकशी केली जाणार आहे. यानंतर या अभिनेत्रीला देखील NCB च्या चौकशीचा सामना करावा लागू शकतो.

मात्र त्यानंतर चर्चा रंगली होती आहे की ज्या अभिनेत्री NCB’च्या रडारवर आल्या आहेत त्यांच्यावर केवळ आरोप आहेत आणि चौकशीत त्यांची नावं समोर आली आहेत. मात्र कंगनाने स्वतः जाहीरपणे आपण ड्रगिस्ट असल्याचं म्हटलं होतं आणि त्यासंदर्भात व्हिडिओ पुरावे देखील उपलब्ध आहेत. परंतु कंगना चौकशीच्या फेऱ्यात का नाही यावरून भाजपवर संशय व्यक्त करण्यात येतं होता.

मात्र कंगना रणौत जर ड्रगिस्ट असेल तसं ती बोलली असेल तर त्याबाबतची सत्यता पडताळून तिची देखील चौकशी झाली पाहिजे. असे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले आहेत. पुण्यात एका कार्यक्रमासाठी ते आले होते, त्यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांनी हे विधान केले.

यावेळी प्रविण दरेकर म्हणाले, “कंगनाची शंभर टक्के ड्रगिस्ट असेल, असं बोलली असेल तर चौकशी व्हावी, या विषयाच्या अनुषंगाने कंगना बोलते म्हणून नाही. पण आपल्या वैभवशाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर नवोदीत कलाकार येणार असतील व त्यांना ड्रग्जचे व्यसन जडणार असल्याचं दिसत असेल, तर कुणीही याला पाठिशी घालायचं कारण नाही. कंगनाच्या माध्यमातून विषय जर ऐरणीवर आला असेल, एवढी मोठी आपली फिल्म इंडस्ट्री आहे व त्यात जर ड्रग्जचे व्यसन जडत असेल, तर आपण काळजी घ्यायला नको का? मग ते कोणीही असो, कोणाच्याही संबंधीत असो.”

 

News English Summary: The drugs controversy seems to have rocked Bollywood, with names of biggies tumbling out. After Sara Ali Khan and Rakul Preet Singh, next in line are Deepika Padukone and Shraddha Kapoor, who reportedly are going to be summoned by Narcotics Control Bureau (NCB) for questioning. Whatsapp chats dating back to 2017 have been found in Padukone’s case, with her manager Karishma, related to procuring drugs.

News English Title: Then Kangana Ranaut also Inquire by NCB said BJP Leader Pravin Darekar Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या