2 May 2025 12:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

दिशा सालियनवर बलात्कार आणि मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री पुत्र आत जाणार - नारायण राणे

Who raped Disha Salian, MP Narayan Rane, CM Udhhav Thackrey, Minister Aaditya Thackeray

मुंबई, २६ ऑक्टोबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कालच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत निशाणा साधला.

एक बेडूक आणि त्याची दोन पोरं:
सध्या संपूर्ण देशात कोरोना संसर्ग आहे. त्यातच आता भाजपने सांगितलं आहे की, बिहारमध्ये मोफत लस दिली जाणार आहे. पण काही जणांना इंजनेक्शन द्यावं लागतं. तर काही जणांना माणसाचं नाही तर गुरांचं इंजेक्शन द्यावं लागतं. काही जण तर बेडकं आहेत.

तुम्हाला माहिती एक गाणं होतं. त्यानुसार आता मी म्हणतो की, ‘बेडकाच्या पिल्लाने वाघ पाहिला, वाघाची डरकाळी पाहून लपला.’ या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला आणि त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतो. पण काय तो आवाज… नुसता चिरका.. तुम्हाला आताच सांगतो वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर तो काय मांजरासारखा शेपूट फिरवत बसणार नाही. फटका मारणारच.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता नारायण राणे आणि त्यांच्या पुत्र्यांवर टीका केली होती.

दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे कसलेही ताळतंत्र नसलेले निर्बुद्ध आणि शिवराळ बडबड होती. दिशा सालियनवर बलात्कार कोणी केले आणि कोणी मारले, हे लवकरच बाहेर येईल. त्यामध्ये एक मंत्री आत जाईल तो मुख्यमंत्री पूत्र आहे, असा थेट आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केला.

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बेडकाची उपमा राणे आणि त्यांच्या दोन मुलांना दिली होती. यावर नारायण राणे भडकले असून त्यांनी भाजपाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा राणे कुटुंबियांवर आरोप कराल तर गेल्या 39 वर्षांत शिवसेनेत जे काही पाहिले ते सारे बाहेर काढेन अशी धमकी दिली. बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धवना मुख्यमंत्री केले नसते.

कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. ही मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी नाही का? पंतप्रधानांच्या कामाबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. त्यांनी महाराष्ट्र सांभाळावा. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणावी, भाषणात कॉमा वापरत नाहीत, फुलस्टॉप वापरत नाहीत. दाणवेंचा बाप काढतात तो पण दिल्लीत. गोमुत्र, शेण रेशनवर सुरु केले का? अशी भाषा वापरू नये. तुम्ही ही भाषा सोडली नाही आणि आमचा जर तोल गेला तर महागात पडेल. साहेबांकडे पाहून आम्ही शांत आहोत, असा इशारा दिला.

 

News English Summary: MP Narayan Rane has strongly reacted to this. Chief Minister Uddhav Thackeray’s speech at the Dussehra rally was an irrational and Shivral babble without any rhythm. Who raped and who killed Disha Salian will come out soon. Narayan Rane directly accused Uddhav Thackeray and Aditya Thackeray that a minister will be the son of the Chief Minister.

News English Title: Who raped Disha Salian chief Ministers son will be arrested soon said MP Narayan Rane angry on Udhhav Thackrey comment News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या