30 April 2025 5:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या

Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | प्रवाशांचे कोणत्याही प्रकारचे हाल होऊ नये आणि प्रवाशांना प्रत्येक सुविधेचा पुरेपूर लाभ उचलता यावा यासाठी नवनवीन प्रणाली आणल्या गेल्या आहेत. आजच्या घडीला प्रवाशाला तिकीट काउंटरवरून तसेच ऑनलाइन पद्धतीने अगदी सहजपणे तिकीट काढता येते. परंतु काही व्यक्तींना एक सामान्य प्रश्न उद्भवतो तो म्हणजे ऑनलाइन आणि तिकीट काउंटरवरील तिकिटामध्ये नेमका काय फरक असतो. या दोन्ही तिकिटांमध्ये स्वस्त तिकीट नेमके कोणते. आज आपण या सर्व गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

ऑनलाइन तिकिटे महाग असतात :
काउंटरवर जाऊन काढलेले तिकीट हे ऑनलाईन पद्धतीने काढलेल्या तिकिटापेक्षा स्वस्त असते. म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने काढलेले तिकीट प्रवाशाला महाग पडते. आता ऑनलाईन तिकिटे एवढी महाग का असतात याविषयी जाणून घेऊया.

ऑनलाइन तिकिटे महाग का असतात :
ऑनलाइन पद्धतीने काढलेले तिकीट महाग का असते याचे उत्तर खुद्द रेल्वे मंत्र्यांनी राज्यसभेत दिले आहे. जे प्रवासी ऑनलाइन पद्धतीने तिकीट बुक करतात त्यांना थेट आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तिकीट बुक करावे लागते. यामध्ये प्रवाशांकडून व्यवहार शुल्क आणि सुविधा शुल्क आकारले जाते आणि म्हणूनच रेल्वे तिकिटांचे ऑनलाईन भाडे जास्त असते. ऑनलाइन तिकिटाची सर्व माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे IRCTC प्रवाशांना ऑनलाईन तिकीट देण्यासाठी बराच खर्च करते. तिकीट इन्फ्रास्ट्रक्चरची देखभाल यांसारख्या गोष्टींसाठी IRCTC सुविधा शुल्का करण्याचा प्रयत्न करते. यामध्ये बँक ट्रांजेक्शन चार्जचा देखील समावेश होतो असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.

प्रवाशांचा वेळ त्याचबरोबर वाहतूक खर्चात होते मोठी बचत :
IRCTC वेबसाईटवरून ऑनलाईन तिकीट बुक करणे हा पर्याय प्रवाशांसाठी फायदेशीर ठरला आहे. रेल्वेचे तिकीट दर कमी असल्यामुळे रेल्वेला कायम गर्दी असते. अशावेळी बहुतांश प्रवासी स्वतःचे आरक्षण तिकीट काढून घेतात. आरक्षण काउंटरवर भली मोठी लाईन पाहायला मिळते. अशावेळी ऑनलाइन पद्धतीने तिकीट काढण्याची मुभा मिळाल्यानंतर चटकन तिकीट बुक होते त्याचबरोबर वाहतुकीचा खर्च आणि वेळेची देखील मोठी बचत होते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(70)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या