19 October 2021 7:35 AM
अँप डाउनलोड

अनिल देशमुख नॉट रिचेबल असल्याचं वृत्त चुकीचं | सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ED समोर चौकशीला जाणार

Anil Deshmukh

मुंबई, १९ जुलै | भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली असून, रविवारी देखील त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले. या छाप्यानंतर देशमुख यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अनिल देशमु ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली होती. अटकेच्या भीतीने देशमुख गायब झाले असल्याचं बोललं जात असून, ईडीकडून त्यांचा शोध घेतला जात आहे असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं होतं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मनी लॉर्डिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबईतील संपत्ती ईडीने जप्त केली आहे. मुंबईतील घर आणि उरण परिसरातील जमीन अशी मिळून 4 कोटी 20 लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त केल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं. मात्र, या संपत्तीची बाजारभावाप्रमाणे आजची किंमत ही 300 कोटीच्या वर असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे देशमुख यांची 4 नाही तर तब्बल 300 कोटी रुपयाची संपत्ती जप्त केल्याचं बोललं जात आहे. याबाबत स्वत: अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलंय. आपली 300 कोटी नाही तर फक्त 4 कोटीची संपत्ती ईडीने तात्तपुरती जप्त केल्याचं देशमुख म्हणाले.

ईडीने माझ्या परिवाराची अंदाजे 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मुलगा सलील देशमुख याने 2006 मध्ये 2 कोटी 67 लाख रुपयाची जमीन खरेदी केली होती. ती जमीन ईडीने जप्त केली आहे. पण काही वर्तमानपत्रात 2 कोटी 67 लाख रुपयांची जमीन 300 कोटीची दाखवून गैरसमज पसरवले जात आहे, असं देशमुख यांनी म्हटलंय. तर मला ईडीचे समन्स आले होते. त्याविरोधात मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा जो निकाल येईल त्यानंतर मी स्वत: ईडीसमोर माझा जबाब नोंदवायला जाणार आहे, असं देशमुख यांनी म्हटलंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Assets worth Rs 4 crore seized from ED not Rs 300 crore explains Anil Deshmukh news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(68)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x