महाराष्ट्रातील तुमचे मित्र मंडळी, नातेवाईक विदेशात अडकले? हा फॉर्म भरा
मुंबई, ५ मे: देशात करोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून राज्याला याचा मोठा फटका बसला आहे. करोनामुळे जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन आणि करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेचं खूप मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने आपल्या खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच अनेक नव्या विकास योजना आणि भरती प्रक्रियांवर काही दिवसांसाठी स्थगिती आमली आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत विदेशात अनेक भारतीय अडकून पडले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातीलही नागरिकांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वीच सिंगापूरमध्ये राहणाऱ्या जवळपास ४८०० भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्तांनी दिली. सिंगापूरमध्ये काम करणाऱ्या विदेशी नागरिकांसह भारतीय मोठ्या संख्येने डॉरमिट्रीमध्ये राहतात. सिंगापूरमध्ये आतापर्यंत १८२०५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सिंगापूरमधील आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली आहे. त्यामुळे सर्वच राज्यातील सरकारने याची गंभीर दखल घेत आपल्या राज्यातील नागरिकांच्या घरवापसीसाठी पुढाकार घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून विदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीयन नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक फॉर्म जारी करण्यात आला आहे. त्यासोबत एक मेसेजही देण्यात आला आहे. तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात, पण सध्या विदेशात अडकले आहात. तर, खाली देण्यात आलेला फॉर्म भरावा, अशी माझी आपणास विनंती आहे. राज्य सरकारकडून परराष्ट्र मंत्रालयास याबाबतची माहिती देण्यात येईल. तसेच आपल्याला लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन म्हटले आहे.
If you are from Maharashtra & are stranded abroad, we request you to fill the form linked below. The State will pass this information & coordinate with the Ministry of External Affairs to facilitate your return as soon as the restrictions are lifted.https://t.co/M2gI7Mqn5z
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 5, 2020
दुसरीकडे लॉकडाऊन कालावधीत करण्यात आलेल्या वाढीच्या अनुषंगाने राज्य शासनाने राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र (एम.एम.आर.), मालेगाव महानगरपालिका, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालयातील उपस्थिती 5 टक्क्यांपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray has appealed to the Maharashtrian citizens stranded abroad. A form has been issued from the official Twitter handle of the Chief Minister’s Office. A message has also been given along with it. You are a citizen of Maharashtra, but are currently stuck abroad. So, I request you to fill the form given below.
News English Title: Story please fill form chief ministers of Maharashtra Uddhav Thackeray office appeal Marathi people abroad News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News