1 December 2022 8:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Limit | खासगी नोकरदारांना आता 25000 रुपये पेन्शन मिळणार, तुमचे पैसे 333 टक्क्यांनी असे वाढणार पहा ITR Filling | तुमची यामार्गे सुद्धा कमाई होते का? इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते, टॅक्स भरावा लागणार Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा Money From IPO | हा IPO दुसऱ्या दिवशी 6 पट सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयांचा प्रीमियम, मोठ्या कमाईचे संकेत Equity Mutual Fund | इक्विटी फंडात पैसे गुंतवता? चांगले फंड कसे निवडावे आणि खराब फंडमधून कधी बाहेर पडावे? जाणून घ्या Talathi Bharti 2022 | राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती, त्वरित ऑनलाइन अर्ज करा PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 पदांची भरती, पटापट अर्ज करा
x

कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण येऊ नये हीच चीनची इच्छा..कारण? - गुप्तचर संस्थांचा अहवाल

Corona Crisis, Covid 19, China, Vaccine, Wuhan Lab

बीजिंग, ५ मे: जगातला कोरोना मृत्यूचा आकडा अडीच लाखांच्या जवळ गेला आहे. २ लाख ४८ हजार ६५३ जणांचा मृत्यू झालाय. तर ३५ लाख ८४ हजार ११६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ११ लाख ६१ हजार ६७७ लोक बरे झाले आहेत. रशियात एकाच दिवसात तब्बल १० हजार ५८१ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ०१ लाख ४५ हजार २६८ एवढी झाली आहे. राजधानी मॉस्कोमध्ये सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी विषाणूची लागण चीनच्या लॅबमधून पसरल्याचा मोठा पुरावा मिळाला असल्याचे सांगितले. मात्र माइक यांनी माध्यमांना कोणतेही पुरावे दिले नाहीत. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, कोरोनाव्हायरसची लस तयार करण्याचे काम जोरात सुरू असून, या वर्षाअखेरीस नक्कीच लस मिळेल.

दरम्यान, अमेरिकेतील काही राज्यांमध्ये बाजार आणि दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक असणार आहे. ट्रम्प यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की, कोरोनाचा वाईट काळ टळून गेला आहे.

दुसऱ्या बाजूला अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या पाच देशांच्या गुप्तचर संस्थांनी तयार केलेल्या १५ पानांच्या अहवालात ही बाब नमूद केली आहे. ‘द सन’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण यावे अशी चीनची इच्छा नसल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. चीनने अनेक देशांना आणि वैज्ञानिक संस्थांना करोना विषाणूचा लाइव्ह सॅम्पल देण्यास नकार दिला आहे. इतकेच नव्हे तर चीनने ग्राउंड झिरोवर जाण्यास अथवा पेशंट झिरोला भेटण्यासही मनाई केली असल्याचे अहवालात म्हटले आहे. याच अहवालाच्या आधारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनवर आरोप करत असल्याची चर्चा आहे.

या गोपनीय अहवालानुसार, करोनाचा संसर्ग माणसांमध्ये फैलावत असल्याची माहिती चीनने जाणीवपूर्वक लपवली. त्याशिवाय ज्या डॉक्टरांनी, पत्रकारांनी करोनाबाबतची माहिती देण्याचे प्रयत्न केले, असे लोक अचानकपणे गायब झाली असल्याचेही म्हटले आहे. करोनाचा संसर्ग फैलावल्यानंतर चीनने संबंधित संशोधन संस्थेतील एक प्रयोगशाळाच नष्ट केली.

त्याशिवाय यामध्ये काम करणारे शास्त्रज्ञ आणि कर्मचारी गायब झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनने करोनाची माहिती देणाऱ्या व्हिसलब्लोअर डॉक्टर गायब झाल्यानंतर त्यांच्याबाबत कोणतीही माहिती चीनने दिली नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

News English Summary: The 15-page report, compiled by intelligence agencies from five countries, the United States, Britain, Canada, Australia and New Zealand, mentions the matter. ‘The Sun’ has reported about this. “China does not want to control the spread of the corona,” it said.

News English Title: Story spy dossier claims China deliberately obstructed other countries covid 19 vaccine efforts to stop cover up being exposed News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x