14 December 2024 3:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

मी लोकप्रतिनिधी म्हणून तिथं पोहोचलो | मी फक्त तिला उचलून रिक्षात ठेवलं - धनराज घोगरे

BJP, corporator Dhanraj Ghogare, Pooja Chavan case

बीड, ०४ मार्च: मागील काही दिवसांपासून राज्यभरात पूजा चव्हाण प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणामध्ये एका भाजप नगरसेवकाचे नावही समोर येत आहे. भाजपच्या वानवडी भागातील नगरसेवक धनराज घोगरे यांनी पूजाचा लॅपटॉप गायब केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेच्या बीड जिल्हा महिला आघाडी प्रमुख संगीता चव्हाण यांनी अशी तक्रार बीड पोलिसांकडे दिली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की, धनराज घोगरे यांनी पूजाचा लॅपटॉप चोरुन त्यातील माहिती चित्रा वाघ यांना दिली आहे. नगरसेवकाने या संपूर्ण प्रकरणाचे महत्त्वाचे पुरावे आणि माहिती असलेला लॅपटॉप चोरला. मात्र आता हा नगरसेवक गायब झाला असल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे आता पूजा चव्हाण प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे.

दरम्यान, घोगरे यांनी आज थेट पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणातील आपली भूमिका स्पष्ट केली. वानवडी परिसरात इमारतीवरुन उडी घेऊन तरुणीनं आत्महत्या केल्याचं मला कळालं तसं मी तातडीनं लोकप्रतिनिधी म्हणून तिथं पोहोचलो होतो. तिला उचलून मी फक्त रिक्षात ठेवलं आणि पोलिसांना पहिला फोन मीच केला. मोबाइल आणि लॅपटॉपचं मला माहित नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व गोष्टी ताब्यात घेतल्या”, असं धनराज घोगरे म्हणाले.

वास्तविक पूजा चव्हाणने पुण्यातील वानवडी परिसरातील इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. याच इमारती समोर नगरसेवक धनराज घोगरे यांचे घर आहे. पूजाला दवाखान्यात दाखल करण्यात आल्यानंतर तिचा लॅपटॉप गायब झाला. दरम्यान भाजप नगरसेवकानेच पूजाचा लॅपटॉप गायब केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

News English Summary: Ghogre held a press conference today and clarified his role in the matter. As soon as I came to know that a young woman had committed suicide by jumping from a building in Wanwadi area, I immediately reached there as a people’s representative. I just picked her up and put her in the rickshaw and made the first phone call to the police. I don’t know about mobiles and laptops. The police conducted a panchnama at the spot and took everything into custody, “said Dhanraj Ghogre.

News English Title: BJP corporator Dhanraj Ghogare gave explanation over Pooja Chavan case news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x