महत्वाच्या बातम्या
-
TRP Scam | रिपब्लिक चॅनलचे सीईओ विकास खानचंदानी चौकशीसाठी दाखल
टीआरपी घोटाळा (Fake TRP Case) प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या रिपोर्टरला समन्स बजावलेले असताना आता गुन्हे शाखेकडून टीआरपी स्कॅम केसमध्ये आणखी 6 जणांना समन्स जारी करण्यात आले आहे. त्यामुळे रिपब्लिक चॅनेलपुढच्या अडचणी वाढल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांपुढे रिपब्लिकची धाकधूक | चौकशीला गैरहजेरी | न्यायालतात धाव
टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) शिवा सुब्रमण्यम सुंदरम यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. आज त्यांना मुबई पोलिसांपुढे जबाब नोंदविण्यासाठी हजर राहायचे होते. मात्र मुंबई पोलिसांची आक्रमक कारवाई बघता रिपब्लिक टीव्ही वाहिनीवर देखील दडपण असल्याचं पाहायला मिळालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
Fake TRP घोटाळा प्रकरण | गुन्हे शाखेकडून आणखी 6 जणांना समन्स
टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या रिपोर्टरला समन्स बजावलेले असताना आता गुन्हे शाखेकडून टीआरपी स्कॅम केसमध्ये आणखी 6 जणांना समन्स जारी करण्यात आले आहे. त्यामुळे रिपब्लिक चॅनेलपुढच्या अडचणी वाढल्या आहेत. रिपब्लिकच्या 4 वरिष्ठ पदावरील व्यक्तींना हे समन्स जारी करण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
Republic TV'च्या बँक खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिट होणार | CFO'ला समन्स
चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबईपोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल दिली. फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. आज दुसर्याच दिवशी शुक्रवारी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही सीएफओ (चीफ फायनान्स ऑफिसर) शिवा सुब्रमणियम सुंदरम यांना समन्स बजावले आणि मुंबई गुन्हे शाखेने त्यांना 10 ऑक्टोबरला (शनिवार) चौकशीत हजर राहण्यास सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
हाथरस प्रकरण | योगी सरकारने सुप्रीम कोर्टाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात धक्कादायक कारण
हाथरस प्रकऱणावरुन वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात असल्याचं म्हणत सुप्रीम कोर्टाने हे सर्व थांबलं पाहिजे अशा शब्दांत उत्तर प्रदेश सरकारला फटकारलं आहे. हाथरस घटना भयंकर असून आम्हाला न्यायालयात पुन्हा पुन्हा तोच युक्तिवाद नको आहे असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. हाथरसमधील साक्षीदारांना कशा पद्धतीने सुरक्षा पुरवली जात आहे यासंबंधी सुप्रीम कोर्टाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश उत्तर प्रदेश सरकारला दिला आहे. याप्रकरणी सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी मोहीम चालवण्यात आली | काही प्रसारमाध्यमांकडून खोटी माहिती
सुशांत प्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांवर अनेक आरोप करण्यात आले होते. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या आरोपांना उत्तर दिलं असून आम्ही अत्यंत योग्य पद्धतीने तपास केला होता असं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये काही जण मुंबई पोलिसांची बदनामी करत खोटी माहिती पसरवत होते असा आरोप केला असून एक मोहीम चालवली जात होती अशी माहिती दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना परमबीर सिंग यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका करणाऱ्यांना जाहीर आव्हानही दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
योगी म्हणतात यूपीत दंगलीसाठी आतंरराष्ट्रीय फंडिंग | पण हे आहे सत्य
हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने जातीय दंगली भडकवण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा उत्तर प्रदेशातील सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. एका अहवालानुसार एक बनावट वेबसाइट रात्रभरात तयार करण्यात आली आणि त्याद्वारे जातीय दंगली घडवण्याचा कट रचला गेला. justiceforhathrasvictim.cardd.co ही ती वेबसाइट आहे. या वेबसाइटवर हाथरस प्रकरणातील हिंसाचाराची आग भडकवण्यासाठी काय करावं आणि काय करु नये हे सविस्तरपणे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
विवेक राहाडे आत्महत्या | सुसाइड नोट निघाली बनावट | मृत्यूचा भावनिक फायदा घेण्याचा प्रयत्न
बीड तालुक्यातील केतूरा गावात राहणाऱ्या विवेक राहाडे या 18 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. यावेळी एक सुसाइड नोट आढळून समोर आली होती.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC