30 April 2025 5:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

केंद्राला सुप्रीम धक्का | प्रताप सरनाईक कुटुंबियांना ED कारवाईवरून अटक न करण्याचे आदेश

Supreme Court, stays enforcement directorate, Shivsena MLA Pratap Sarnaik

मुंबई, ९ डिसेंबर: मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena Leader Pratap Sarnike) यांच्यावर अंमलबजावणी संचनालयानं अर्थात (ED) ईडीने कारवाईचा बडगा उगारला होता. पण आता सुप्रीम कोर्टाने प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा देत ईडीला अटक न करण्याचे आदेश दिले आहे.

दिल्लीतून आलेल्या ईडीच्या पथकाने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर ईडीने चौकशीसाठी प्रताप सरनाईक यांना वारंवार नोटीसा बजावल्या होत्या. ईडीच्या कारवाई विरोधात प्रताप सरनाईक यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने प्रताप सरनाईक यांची बाजू घेत दिलासा दिला आहे.

टॉप ग्रुप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने 24 नोव्हेंबरला प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे. (MLA Pratap Sarnaik Protection from arrest by the Supreme Court). सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या आदेशानुसार, प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कुठलीही कारवाई करु नये, असे आदेश दिले आहेत. ईडी सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलवू शकते. मात्र त्यांना अटक करु शकत नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान हा प्रताप सरनाईक तानाजी मालुसरे आहे. प्रत्येक संकटातून बाहेर येईल, असं सांगतानाच हे कॉर्पोरेट वॉर असून माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न झाला, असा दावा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यानी काल केला होता. मला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एकच गोष्ट सांगायची आहे, देशात प्रामुख्याने महाराष्ट्रात राजस्थानातून आलेले मंगलप्रभात लोढा, भारतीय जनता पक्षाचे आमदार पराग शाह ज्यांनी महापालिका निवडणुकीला ५ हजार कोटीची संपत्ती दाखवली त्यांची चौकशी केली का? असा सवाल केला होता.

 

News English Summary: Shiv Sena MLA Pratap Sarnike was charged with money laundering by the Enforcement Directorate (ED). But now the Supreme Court has given a big relief to Pratap Saranaik and ordered the ED not to take any action.

News English Title: Supreme Court stays enforcement directorate proceeding against Shivsena MLA Pratap Sarnaik news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या