23 September 2021 5:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

कॉर्पोरेट टॅक्स घटवणार; केंद्राकडून उद्योग क्षेत्रासाठी चांगला निर्णय

NIrmala Sitharaman, Finance minister, Corporate Tax, Industry, Manufacturing

पणजी: गोवा येथे होत असलेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योग जगताला मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. कंपन्या आणि व्यावसायिकांना दिलासा देताना कॉर्पोरेट टॅक्स घटवण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. कॉर्पोरेट टॅक्स घटवण्यासाठीचा अध्यादेश पारित झालेला आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट सेक्टरला दिलासा देणारी घोषणा केली. कंपनी करात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या या निर्णयाचं शेअर बाजाराकडूनही स्वागत करण्यात आलं. या नंतर शेअर बाजाराचा निर्देशांक १५०० अंकांनी उसळल्याचा पहायला मिळाला. उद्योग क्षेत्राला उभारणी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कपातीनंतर कोणतीही सूट न घेणाऱ्या देशातील कंपन्या आणि देशातील नव्या उत्पादन कंपन्यांना आता २५.१७ टक्के कर द्यावा लागणार आहे. तसंच याव्यतिरिक्त कंपन्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही. तरच देशातील कंपन्यांवार लागणारा MAT देखील न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कॅपिटल गेनवर लागणारा सरचार्जही आता आकारण्यात येणार नाही.

केंद्र सरकारने केलेल्या प्रमुख घोषणा:

    1. ऑक्टोबर २०१९ नंतर स्थापन झालेल्या कंपन्यांसाठी अधिभार आणि सेस धरून कॉर्पोरेट टॅक्स १७.०१ टक्के इतका असेल.
    2. मिनिमम अल्टरनेट टॅक्स (एमएटी) १८.५ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर
    3. कॉर्पोरेट कंपन्यांसाठी १.४५ लाख कोटींचे आर्थिक पॅकेज
    4. फॉरेन पोर्टफोलिओ गुंतवणुकीवरील कॅपिटल गेन्स टॅक्स रद्द

हॅशटॅग्स

#Nirmala Sitharaman(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x