14 December 2024 12:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE
x

Adani Power Share Price | अदानी ग्रुपचा 'अदानी पॉवर' शेअर ठरतोय सर्वात पॉवरफुल शेअर, काही महिन्यात पैसे तिपटीने वाढवतोय

Adani Power Share Price

Adani Power Share Price | हिंडेनबर्ग फर्मच्या वादग्रस्त आरोपानंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले होते. मात्र आता अमेरिकन संस्थेने अदानी समूहाला क्लीन चिट दिल्यानंतर अदानी समुहाच्या कंपन्यांचे शेअर तेजीत आले आहेत. अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स अदानी समुहाच्या सर्व शेअरमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा स्टॉक ठरला आहे. मागील 10 महिन्यांत अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे.

या काळात अदानी समूहाच्या कंपनीचे शेअर्स 132 रुपयेवरून वाढून 500 रुपये किमतीवर पोहचले आहेत. अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 589.30 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 132.55 रुपये होती. शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी अदानी पॉवर स्टॉक 4.72 टक्के घसरणीसह 535.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने अवघ्या दहा महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे. 28 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 132.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 7 डिसेंबर 2023 अदानी पॉवर स्टॉक 562.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या काळात अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 305 टक्क्यांनी वाढली होती. जर तुम्ही 28 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.24 लाख रुपये झाले असते.

मागील 5 महिन्यांत अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 135 टक्के परतावा कमावून दिला आहे. 13 जुलै 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 237.35 रुपये किमतीवर पोहचले होते. तर 7 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 562.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होत. मागील 6 महिन्यांत अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 102 टक्के वाढली होती.

मागील एका महिन्यात अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के परतावा कमावून दिला आहे. 8 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 393.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 216779 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price NSE 09 December 2023.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x