लाहौर : आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला चीनकडून तब्बल 2 अब्ज डॉलर्सचे कर्ज देणार आहे. चिनी सरकारकडून याबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या असून २५ मार्चपर्यंत स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या खात्यात २.१ अब्ज अमेरिकी डॉलर्स (१५ अब्ज यूआन) जमा होतील असे पाकच्या वित्त विभागाचे प्रवक्ते खकान नजीब खान यांनी सांगितले.
दरम्यान, पाकिस्तानकडे असलेले परकीय चलन कमी झाल्याने यापूर्वी पाकला सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीकडून प्रत्येकी एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचे अर्थसहाय्य मिळालेले आहे. त्यामुळे आर्थिक गर्तेत सापडलेला पाकिस्तान भविष्यात अजून अडचणीचा सामना करू शकतो.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		