नवी दिल्ली : सदर माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे आणि त्यामुळे देशातील प्रगतीचे गोडवे गाणाऱ्या भाजप सरकारचा चेहरा समोर आला आहे. उपलब्ध आकडेवारी नुसार देशभरात किमान २० कोटी गरिबांना अन्नावाचून पूर्णपणे उपाशी राहावे लागते किंवा अर्धपोटी भोजनावर दिनक्रम काढावा लागतो. देशात दरडोई सरासरी ५०० ग्रॅम अन्नाची गरज आहे. दरम्यान, पोटभर अन्न न मिळाल्यामुळे देशभरात प्रतिदिन ८२१ बालकांचा मृत्यू होतो.
परंतु दुसऱ्याबाजूला सरकारी अनास्था सुद्धा समोर आली आहे. सरकारी बेपर्वाईमुळे गेल्या दहा वर्षांत गोदामांमधील तब्बल ७.८० लाख क्विंटल धान्य अक्षरशा सडून वाया गेल्याचे स्पष्ट झालं आहे. याचा दुसरा अप्रत्यक्ष अर्थ असा होतो की प्रतिदिन सरासरी ४३,००० लोकांच्या वाट्याचे अन्न सडल्यामुळे वाया गेले. हे सर्व माहितीच्या अधिकारात समोर आलं आहे आणि देशातील विदारक वास्तव समोर आले आहे.
पावसात भिजल्यामुळे १० वर्षांत सरकारी अथवा गैरसरकारी गोदामांमधील धान्य मोठ्या प्रमाणावर सडून वाया गेले. हाती आलेल्या आकडेवारीनुसार यूपीए सरकारच्या ६ वर्षांच्या कालखंडात तब्बल ४.४२ लाख क्विंटल धान्य सडले, तर मोदी सरकारच्या केवळ ४ वर्षांच्या काळात तब्बल ३.३८ लाख क्विंटल इतके धान्य सडल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान म्हणतात की, चार वर्षांत धान्य खराब होण्याचे प्रमाण घटले, याचे कारण धान्य सडू नये, यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना मोदी सरकारने केल्या आहेत असं न पटणारं उत्तर दिल आहे.
दरम्यान, यंदा एकूण किती प्रमाणात नासाडी झाली आहे ती आकडेवारी;
देशभरात साधारणत: २३७.४० कोटी क्विंटल धान्योत्पादन प्रतिवर्षी होते. त्यातील एकूण सरासरी १२.६४ कोटी क्विंटल धान्य शेतातून गोदामात पोहोचेपर्यंत खराब होऊन जाते. यंदा सप्टेंबरपर्यंत ४६४0 क्विंटल धान्य खराब झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
राज्य सडलेले अन्नधान्य;
- प. बंगाल : १ लाख ५४ हजार ८१० क्विंटल
- बिहार : ८२ हजार १० क्विंटल
- पंजाब : ३२ हजार ८०० क्विंटल
- उत्तर प्रदेश : २४ हजार ४९० क्विंटल
- उत्तराखंड : ३४ हजार ५८० क्विंटल
- झारखंड : ७ हजार ८९० क्विंटल
- दिल्ली : १३७० क्विंटल
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		