मुंबई, २२ जून | पुढील काही महिन्यांत कामगार कायद्यांत काही बदल होणार आहेत. लवकरच नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू होईल. नवे नियम लागू झाल्यानंतर अनेक गोष्टी बदलणार आहेत. कर्मचाऱ्यांना मिळणारा ओव्हरटाईम, त्यांना मिळणारी इन हँड सॅलरी यामध्ये लवकरच बदल होणार आहेत. नव्या नियमांनुसार सर्वाधिक परिणाम ओव्हरटाईमवर होईल.
जर तुम्ही तुमच्या शिफ्टनंतर १५ ते ३० मिनिटं अधिक काम केल्यास हा अवधी ३० मिनिटं मोजला जाईल. तशी तरतूद नव्या नियमांमध्ये आहे. या नियमांना मंजुरी मिळाल्यास तुम्ही १५ मिनिटं अधिक काम केल्यास तुम्हाला ओव्हरटाईम मिळेल. सध्याच्या नियमानुसार शिफ्टनंतर ३० मिनिटांपर्यंत अधिक काम केल्यास ओव्हरटाईम मिळत नाहीत. त्यामुळे नवे नियम लागू झाल्यास त्याचा कर्मचाऱ्यांना फायदा होईल.
तुम्ही १५ मिनिटांपेक्षा अधिक काम केल्यास ओव्हरटाईम लागू होईल. तुमच्या पगाराच्या हिशोबानं अर्धा तासाचं वेतन किती त्याचं गणित करण्यात येईल. या प्रकारे ओव्हरटाईम दिला जाईल. नव्या कामगार नियमानुसार कोणताही कर्मचारी सलग ५ तासांपेक्षा जास्त वेळ काम करू शकत नाही. ५ तास काम केल्यानंतर त्याला अर्धा तासाचा ब्रेक दिला जाईल.
कर्मचाऱ्यांना पुरेशी विश्रांती मिळावी, कंपन्यांकडून त्यांचं शोषण होऊ नये, या हेतूनं कामगारांसाठी नवे नियम तयार करण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार कर्मचाऱ्याच्या एकूण पगारात बेसिक पगाराचं प्रमाण ५० टक्के असेल. उर्वरित ५० टक्क्यांमध्ये इतर भत्त्यांचा समावेश असेल. सध्याच्या स्थितीत अनेक कंपन्या बेसिक पगारात २५ ते ३० टक्केच रक्कम ठेवतात.
कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील जवळपास ७० ते ७५ टक्के रक्कम इतर भत्त्यांमध्ये दाखवतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना इन हँड सॅलरी जास्त मिळते. पीएफ बेसिक सॅलरीवर मोजला जातो. सध्याच्या घडीला बेसिक सॅलरी एकूण पगाराच्या २५ ते ३० टक्के असल्यानं पीएफचा हिस्सा कमी आहे. मात्र बेसिक सॅलरी वाढल्यास पीएफ जास्त कापला जाईल. त्यामुळे इन हँड सॅलरी ७ ते १० टक्क्यांनी कमी होईल.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की पोहचावा.
News Title: New Labour code effect if you do work 15 minute more you get overtime on salary news updates.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		