महत्वाच्या बातम्या
-
२०१७-१८ आर्थिक वर्षात प्राप्ती कराचा विक्रमी भरणा, तब्बल १०.०३ लाख कोटी रुपये
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं (सीबीडीटी) दिलेल्या अधिकृत माहितीनुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात इन्कम टॅक्सच्या भरणा विक्रमी म्हणजे तब्बल १०.०३ लाख कोटी रुपये इतका झाला असून तो आज पर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे.
7 वर्षांपूर्वी -
भारतातील तंत्रज्ञान आणि डिजिटल इंडियाचे खरे शिल्पकार माजी पंतप्रधान राजीव गांधी
८०च्या दशकात दूरगामी परिमाण करणारी मोठी स्वप्न बघून राजीव गांधी यांनी भारतातील दूरसंचार आणि तंत्रज्ञानाचा खरा अर्थाने पाया रचला होता. केवळ तंत्रज्ञानच नव्हे तर ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, लसीकरण, साक्षरता, खाद्यतेल, टेलिकॉम आणि डेअरी विकास याला सुद्धा तंत्रज्ञानाच्या मोहिमे सोबत जोडायला सुरुवात झाली होती.
7 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान राफेल विमान खरेदीबाबत संसदेत एक मिनिट सुद्धा बोलत नाहीत: राहुल गांधी
राहुल गांधी सध्या राजस्थान विधानसभेच्या अनुषंगाने राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राफेल विमान खरेदीवरून जोरदार हल्ला चढवला असून त्यामागील वास्तव काय ते मोदी संसदेत बोलायचं टाळतात असा घणाघात केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात आयआयटी'चा मोठा वाटा : नरेंद्र मोदी
मुंबई आयआयटी’च्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण जगभरात डंका आहे. तसेच भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात आयआयटीचा मोठा वाटा आहे. भारतातून विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून जगभरात भारताचे नाव उंचावत आहेत. त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आयआयटी विद्यार्थ्यांबाबत गौरोद्गार काढले.
7 वर्षांपूर्वी -
सेनेचा प्रादेशिक श्रीमंतीचा विक्रम यंदाही कायम २०१५-१६ मध्ये ६१ कोटी तर २०१६-१७ मध्ये २५ कोटी देणग्या मिळाल्या
मुंबई सारखी श्रीमंत महापालिकेत सत्ता आणि राज्य व केंद्रातील भागीदार शिवसेना हा देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष ठरला आहे. एडीआर ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०१६-१७ या आर्थिक वर्षात शिवसेनेला सर्वाधिक म्हणजे तब्बल २५.६५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. देशभरातील सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीच्या आधारावर एडीआरनं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
गुगलने मला दोनवेळा नाकारल्यानेच फ्लिपकार्ट वेबसाइट उभी राहिली: बिनी बंसल
मी दोनवेळा गुगलला नोकरीसाठी माझा बायोडेटा पाठवला होता, परंतु दोन्ही वेळी मला गुगलने नाकारल होत आणि त्यामुळेच फ्लिपकार्ट वेबसाइट सुरु करू शकलो असं फ्लिपकार्ट’चे संस्थापक बिनी बंसल यांनी बेंगळुरूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात म्हटलं.
7 वर्षांपूर्वी -
सेन्सेक्स आणि निफ्टीचीही ऐतिहासिक भरारी
शेअर बाजारानं आज नवा उच्चांक गाठला आहे आणि बहुसंख्य बँकांच्या शेअर्सचं मूल्य वधारल्यानं बाजारात ही तेजी पाहायला मिळत आहे. आज मुंबई शेअर बाजाराने पहिल्यांदा ३८,००० अंशांचा टप्पा ओलांडला.
7 वर्षांपूर्वी -
इंद्रा नुयी 'पेप्सिको'च्या सीईओ'पदाचा राजीनामा देणार
तब्बल बारा वर्षांच्या सेवेनंतर पेप्सिको’च्या सीईओ इंद्रा नुयी पदाचा राजीनामा देणार आहेत. त्या ३ ऑक्टोबर रोजीी पदावरुन पायउतार होतील असं समजतं, परंतु त्यांच्या राजीनाम्यामुळे बिझनेस वर्तुळात आश्चर्याचा धक्का बसला आहे.
7 वर्षांपूर्वी -
गडकरीजी! देशातील सरकारी नोकऱ्यांबद्दल उत्कृष्ट प्रश्न विचारलात: राहुल गांधी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी नोकऱ्यासंदर्भात केलेलं वक्तव्य त्यांच्या चांगलच अंगलट आलं आहे. कारण त्या वक्तव्यानंतर त्यांनी विरोधकांना आयतीच संधी दिलेली आहे. त्याच विधानाचा संदर्भ घेत राहुल गांधी यांनी ट्विट करत नितीन गडकरींनी आरक्षण आणि सरकारी नोकरीची स्थिती याबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नाबद्दल त्यांना खोचक टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
तुम्ही बँकेत किमान रक्कम न ठेवल्याने बँका मात्र मालामाल
तुम्ही तुमच्या बँक खात्यात किमान रक्कम ठेवली नसेल कदाचित, परंतु त्यामुळे ग्राहकाला जरी दंड बसला असेल तरी बँकांची मात्र तुफान चांदी झाल्याचे समजते. कारण किमान रक्कम न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून बँकांनी दंडापोटी तब्बल ५,००० कोटी रुपयांची रक्कम वसूल केली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात बँकांनी बँक खात्यात आवश्यक रकमेपेक्षाही कमी पैसे ठेवणाऱ्या ग्राहकांकडून हा मोठा दंड वसूल करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
‘डी’कोल्ड व सॅरिडॉनसह ३४३ औषधांवर लवकरच बंदी?
‘डी’कोल्ड आणि सॅरिडॉनसह ३४३ औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. सर्वाधिक वेदनाशामक तसेच फ्लू’शी संबंधित औषधांवर बंदी येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. कारण ही औषधे ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ औषधे आहेत असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
7 वर्षांपूर्वी -
‘आज की बड़ी खबर' मोदींचा VIDEO: पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी'ला मोदी 'मेहुल भाई' बोलले होते
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘‘आज की बड़ी खबर” असं ट्विट करून २०१५ मधील एक विडिओ प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका कार्यक्रमात १३,००० कोटीच्या पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी’ला ‘मेहुल भाई’ बोलले होते असा तो विडिओ आहे.
7 वर्षांपूर्वी -
एक ट्रिलियन डॉलर बाजारभांडवल असणारी ‘अॅपल’ जगातील पहिली कंपनी बनली आहे
आयफोन बनविणारी कंपनी ‘अॅपल’ एक ट्रिलियन डॉलर बाजारभांडवल असणारी जगातील पहिली कंपनी बनली आहे. शेअरमध्ये तेजी आल्याने कंपनीने हा जागतिक दर्जाचा मान प्राप्त केला आहे. अॅपल’नंतर बाजार भांडवलाच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो तो अॅमेझॉनचा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे गुगलची ‘अल्फाबेट’ कंपनी आणि या तिन्ही कंपन्या अमेरिकन आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मोदी जगभ्रमंती करणारे आजवरचे सर्वात खर्चिक पंतप्रधान ठरले आहेत
मोदींच्या जगभ्रमंतीवर ४ वर्षात तब्बल १४८४ कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच त्यांनी ४ वर्षात १७१ दिवस म्हणजे एकूण १२ टक्के वेळ परदेश वास्तव्यात गेला आहे. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सत्ताकाळात म्हणजे एकूण ९ वर्षात परदेशवारीवर केवळ ६४२ कोटी रुपये खर्च झाला होता.
7 वर्षांपूर्वी -
मनसेच्या अजून एका पाठपुराव्याला यश, सॅनिटरी नॅपकिन्स करमुक्त झाल्याने स्त्रीवर्गाला फायदा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जीएसटी कौन्सिलने सॅनिटरी नॅपकिन्सच्या बाबतीत महत्वाचा निर्णय घेतल्याने समस्त स्त्री वर्गाला त्याचा फायदा होणार आहे. शालिनी ठाकरे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री मुनगंटीवार आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन या करमुक्तीची लेखी सूचना आणि विनंती केली होती, ज्याला आज यश मिळालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
कॅगचा अहवाल; मोदी सरकारच्या तब्बल १९ खात्यांमध्ये ११७९ कोटींचा घोटाळा
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या तब्बल १९ मंत्रालये आणि त्यांच्याशी संलग्नीत विभागाकडून नियम आणि कायद्यांची मोडतोड करून ११७९ कोटींचा घोळ असल्याचे कॅगच्या अहवालात उघड झाले आहे. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळी मोदी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. या अहवालाप्रमाणे विभागाकडून अनियमितपणे पैसे खर्च करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या RCEP करारामुळे २५ कोटी शेतकरी देशोधडीला लागतील? राष्ट्रीय किसान महासंघ
थायलंड येथे २१ जुलै रोजी RCEP अर्थात क्रॉप्रेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट अंतर्गत ट्रेड करारावर भारताकडून स्वाक्षऱ्या करण्यात येणार असून, त्यानिमित्ताने पियुष गोयल हे लवकरच थायलंडला रवाना होणार आहेत. परंतु या करारामुळे देशातील २५ कोटी शेतकरी देशोधडीला लागतील असा आरोप राष्ट्रीय किसान महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक के. व्ही. बिजू यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मंदिर आणि धर्मावर चर्चा करुन देशात रोजगार निर्मिती होणार नाहीये: सॅम पित्रोदा
मला भारताची खरंच चिंता वाटू लागते जेव्हा मी देशात मंदिर, धर्म, जात, देव अशा विषयांवर वादविवाद आणि संघर्ष पाहतो. देशात रोजगार निर्मिती ही कोणत्याही धर्मामुळे नाही तर केवळ विज्ञानच भविष्याची निर्मिती करु शकतं असं ठाम मत भारताच्या मोबाइल क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा यांनी केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ धोरणामुळे अनेक भारतीयांना अमेरिका सोडावी लागेल?
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ या धोरणानुसार नव्या प्रस्तावावर विचार सुरू केलेला. त्यामुळे अमेरिकेतील भारतीय नोकरदारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. या धोरणामुळे अनेक भारतीयांवर अमेरिका सोडण्याची वेळ येऊ शकते.
7 वर्षांपूर्वी -
विकासाचे ढोल बडवणाऱ्या देशात २९ कोटी जनतेची कमाई ३० रुपयांहून कमी
फोर्ब्स’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील अब्जाधीशांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज त्याच अब्जाधीशांची संख्या ११९ इतकी झाली आहे. जागतिक आकडेवारीतील अब्जाधीशांच्या संख्येनुसार भारताने अमेरिक आणि चीनसोडून सर्वच देशांना मागे टाकले आहे. परंतु मोठं मोठ्या अब्जाधीशांचे आकडे वाढत असताना, त्यातून देशात वाढत जाणारी श्रीमंत आणि गरिबांमधील दरी दुर्लक्षित होत आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN