3 May 2025 10:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER
x

लॉकडाउनमुळे अनेक क्षेत्रांवर प्रभाव पडल्याने करोडो लोकांच्या नोकऱ्या जाणार - MSME रिपोर्ट

Corona Crisis, Lockdown, Unemployment, Job Loss, MSME Report

नवी दिल्ली, २९ एप्रिल: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक उद्योगधंदे बंद आहेत. कोरोनामुळे जीडीपीमध्ये मोठा वाटा असणार्‍या खाजगी, गुंतवणूक आणि परदेशी व्यापाराला चांगला फटका बसला आहे. यामुळे कोट्यावधी लोकांचा रोजगार जाण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या कहर हा उद्योगधंद्यांवर देखील भारी पडणार आहे.

कोरोनाचा विमान वाहतुकीचा सर्वाधिक फटका बसला आहे. जगातील बर्‍याच देशांमध्ये कोरोनामुळे लॉकडाउन आहे. भारताची उड्डाणे देखील पूर्णपणे बंद आहेत. या क्षेत्रात वेतन कपात व कॉस्ट कटींग सुरू झाली आहे. भारतातच या क्षेत्रातील हजारो नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. जर लॉकडाऊन आणखी वाढला तर अनेक विमान कंपन्यांच्या शटडाउन व्हायला उशीर लागणार नाही. जागतिक व्यापार सल्लागार कंपनी केपीएमजीच्या म्हणण्यानुसार, एविएशनसाठी हे २००८-०९ च्या मंदीपेक्षा मोठे संकट आहे.

दुसरीकडे लॉकडाऊनच्या कालावधीत एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देशातील बेकारीचा दर २६.२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. लॉकडाऊनमुळे देशातीलसुमारे १४ कोटी लोक बेकार झाले आहेत असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयइ) या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी सांगितले. ते म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यात ४० टक्के असलेले देशातील रोजगाराचे प्रमाण आता २६ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे. देशामध्ये सुमारे १ अब्ज लोक विविध प्रकारची कामे करून आपली रोजीरोटी कमावत असतात.

कोरोनाचा कहर हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससारख्या क्षेत्रावर ही पडू शकतो. उड्डाणे, वाहतूक आणि प्रवास पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्सही बंद आहेत. लॉकडाउन उघडल्यानंतर लोकल वाहतूक सुरु झाली तर थोडासा व्यवसाय होऊ शकतो, परंतु आंतरराष्ट्रीय पर्यटक येण्यास कित्येक महिने लागू शकतात. अगदी स्थानिक पातळीवर देखील, लोकं पुढील काही महिने रेस्टॉरंट्स किंवा गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळतील. अशा परिस्थितीत या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.

देशातील एकुण रोजगारांमध्ये १४ टक्के घट झाली. याचा अर्थ १४ कोटी लोक लॉकडाऊनमुळे बेकार झाले आहेत. या विषयावर महेश व्यास यांनी सीएमआयइच्या वेबसाइटवर एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे देशातील ग्रामीण व शहरी भागामध्ये बेकारी वाढली आहे. देशातील बेकारीचे प्रमाण ग्रामीण भागात २६.७ टक्के तर शहरी भागात २५.१ टक्के आहे. मार्च महिन्याची अखेर व एप्रिल महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत बेकारीचे प्रमाण २३ ते २४ टक्के इतके होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ते २३.८ टक्के इतके झाले तर दुसºया आठवड्यात ते २३.४ टक्क्यांपर्यंत खाली घसरले. पण एप्रिलच्या तिसºया आठवड्यात बेकारीचे प्रमाण पुन्हा २४ टक्क्यांवर गेले.

 

News English Summary: Many businesses are closed due to the increasing prevalence of corona. The corona has hit private, investment and foreign trade, a major contributor to GDP. It is expected to provide employment to millions of people. Corona’s havoc will also hit businesses.

News English Title: Story corona lockdown is likely to lose millions of jobs in India News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या