4 May 2025 4:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

राजीव गांधी फाउंडेशनसह ३ ट्रस्टच्या चौकशीचे केंद्र सरकारचे आदेश

The Home Ministry, Congress, Gandhi family, Rajiv Gandhi Foundation

नवी दिल्ली, ८ जुलै : गृह मंत्रालयानं कॉंग्रेसच्या अडचणी वाढवल्या आहेत. गृह मंत्रालयानं कॉंग्रेस आणि गांधी परिवाराच्या राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या तिघांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. राजीव गांधी फाउंडेशनवर झालेल्या आरोपानंतर पीएमएलए, आयकर कायदा आणि एफसीआरएच्या विविध कायदेशीर तरतुदींच्या उल्लंघनाची चौकशी केली जाणार आहे. यासाठी एक आंतर-मंत्री समिती तयार करण्यात आली आहे.

मंत्रालयाच्या या निर्णयानंतर कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांची अडचण वाढू शकतात. अलीकडेच कॉंग्रेस पक्षाशी संबंधित अनेक ज्येष्ठ नेत्यांवर चीन संबंधित फंडिंग कनेक्शनवर बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर हे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

परदेशातून स्वीकारण्यात आलेल्या देणग्यासंदर्भात केंद्र सरकार राजीव गांधी फाउंडेशनबरोबरच इतर दोन फाउंडेशनचीही चौकशी करणार असल्याचं वृत्त आहे. यात राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट व इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट यांचा समावेश आहे. आंतर मंत्रालयीन समितीच या तिन्ही संस्थांच्या देणग्यासंदर्भातील चौकशी करणार आहे.

एका व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काँग्रेसवर चीनकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता. राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून मिळालेल्या देणगीवरून हा आरोप करण्यात आला होता.

 

News English Summary: The Home Ministry has exacerbated the problems of the Congress. The Home Ministry has ordered an inquiry into the Congress and the Gandhi family’s Rajiv Gandhi Foundation, Rajiv Gandhi Charitable Trust and Indira Gandhi Memorial Trust.

News English Title: The Home Ministry has ordered an inquiry into the Congress and the Gandhi family Rajiv Gandhi Foundation News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या