4 December 2024 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
x

Bigg Boss Marathi | 'जय दुधाने'ने केलं महाराष्ट्राच्या वाघिणीचं कौतुक, दोघांच्या मस्तीचा व्हिडिओ होत आहे व्हायरल - Marathi News

Highlights:

  • Bigg Boss Marathi
  • जय आणि आर्याची सुरू आहे मस्ती :
  • नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहून व्हाल थक्क :
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉस 3 फर्स्ट रनरअप ‘जय दुधाने’ आणि बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील घराबाहेर पडलेली सदस्या ‘आर्या जाधव’ या दोघांचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे. दोघांचा हा व्हिडिओ अतिशय गमतीशीर असून दोघांनीही निक्की तांबोळीला ट्रोल केल्याचं पाहायला मिळतंय. दोघांची पूर्ण मज्जामस्ती अनेकांना आवडली आहे. बऱ्याचजणांनी आर्याचं पुन्हा एकदा कौतुक केल्याचं पाहायला मिळतय.

जय आणि आर्याची सुरू आहे मस्ती :

जय आणि आर्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले दिसत आहेत. दोघांचीही मस्ती सुरू होताच त्यांनी सर्वप्रथम निक्कीवर निशाणा धरला आहे. व्हिडिओमध्ये जय म्हणतोय की,”बिग बॉस सांगत आहेत की आर्या तुम्ही निक्कीला खूप चांगली कानाखाली मारली”. त्याचं बोलणं झाल्यानंतर आर्य म्हणते,” ए ए कॉन्ट्रोव्हरशिअल बोल”. पुढे जय आणखीन काहीतरी म्हणतो आणि पूर्ण महाराष्ट्राने तुला सपोर्ट केला आहे अशा पद्धतीचा वाक्य देखील तो म्हणतो. पुढे आर्या म्हणते,”दे कॉल मी महाराष्ट्राची वाघीण”. तर, पुढे जय परत म्हणतो की,”हे चांगलंच आहे तुला या गोष्टीवर गर्व असायला हवा”. अशी गंमत जंमत आणि हशा पिकवत दोघांनी निक्कीची चांगलीच फिरकी घेतली आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहून व्हाल थक्क :

दोघांच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी डोक्यावर धरलं आहे. काहीजण आर्याचं अजून सुद्धा कौतुक करताना दिसत आहेत तर, काही जर आर्यालाच ट्रोल करत आहेत. व्हिडिओला आलेल्या सर्व प्रतिक्रिया आर्याच्या आणि जय दुधानेच्या विरोधात असल्याच्या पाहायला मिळतायेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

सध्या बिग बॉसच्या घरात विनर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर यंदाचा बिग बॉस 100 दिवसांचा नाही तर, फक्त 70 दिवसांचाच असणार आहे. नुकतीच या गोष्टीची घोषणा झाली असून सर्व प्रेक्षकवर्ग बिग बॉसच्या वोटींग लिस्टमध्ये व्यस्त झाले आहेत. त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या बिग बॉसचा विजेता ‘अभिजीत सावंत’ होणार असल्याच्या चर्चांना उधान आलेलं पाहायला मिळत आहे.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi Jay Dudhane supported Aarya Jadhao for slapping Nikki Tamboli 25 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x