14 December 2024 10:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर
x

Bigg Boss Season 5 | सुरज चव्हाण सिद्धिविनायकाचरणी, उपविजेता अभिजीत सावंतने देखील घेतलं बाप्पांचं दर्शन - Marathi News

Highlights:

  • Bigg Boss Season 5
  • सर्वातआधी गाठलं सिद्धिविनायकाचे मंदिर :
  • जानवीचा देखील केला सत्कार :
  • एकीकडे बिग बॉस हिंदीची हवा :
Bigg Boss Marathi

Bigg Boss Season 5 | 6 ऑक्टोबर 2024 रोजी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळा पार पडला. सोहळ्याला घरातील सर्व सदस्यांनी सोबतच त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थिती दर्शवली. दरम्यान भाऊच्या धक्क्यावर धक्के देणारे रितेश विलासराव देशमुख देखील महाअंतिम सोहळ्याला त्यांच्या स्टाईलिश अंदाजात हजेरी लावली होती. अशातच बिग बॉसची ट्रॉफी पटकावणारा महाविजेता आपल्या सर्वांचा लाडका सुरज चव्हाण ठरला आहे.

सर्वातआधी गाठलं सिद्धिविनायकाचे मंदिर :
सुरजने बिग बॉसची ट्रॉफी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी थेट सिद्धिविनायकाचं मंदिर गाठलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर केवळ सुरजचा जयजयकार होताना पाहायला मिळतोय. एका गरीब कुटुंबातील मुलगा तोही लिहिता वाचता न येणारा, अशा व्यक्तीमत्वाने बिग बॉसच्या घरातील 70 दिवस पूर्ण करून त्याचबरोबर 70 चे 70 दिवस प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून महा विजेता होण्याचे स्थान पटकावलं. सुरजने बिग बॉसच्या घरात येऊन त्याच्या साध्या भोळेपणामुळे संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. दरम्यान बिग बॉसचा उपविजेता म्हणजेच फर्स्ट रनरअप गायक अभिजीत सावंत आणि गुलीगत विषय सुरज चव्हाण दोघांनीही आपल्या यश प्राप्तीकरिता सिद्धिविनायक बाप्पांचे आभार मानले आहेत. दोघांचे सिद्धिविनायका चरणी नतमस्तक होण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वाहत आहेत.

जानवीचा देखील केला सत्कार :
जानवीने 9 लाख रुपयांची ऑफर स्वीकारून बिग बॉसचं घर सोडलं. तिच्या या निर्णयाचा जल्लोष कुटुंबीयांनी केला आहे. जानवीचा नवरा, त्याचबरोबर मुलगा आणि इतर कुटुंबीयांनी ढोल ताशा वाजवत जानवीचं घरी स्वागत केलं. कुटुंबीयाच्या प्रेमामुळे जानवी अतिशय खुश असतानाची पाहायला मिळाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

एकीकडे बिग बॉस हिंदीची हवा :
मराठी बिग बॉस संपल्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हिंदी बिग बॉसचा अठरावा सीजनला देखील सुरुवात झाली आहे. यामधील सर्व कंटेस्टंटची नावे समोर आली असून. अनेक चेहरे नवीन आहेत. आता बिग बॉस हिंदीच्या घरामध्ये टाईम का तांडव ही थीम ठेवली असून घरामध्ये कोण कोणता तांडव पाहायला मिळणार त्याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेलं आहे. बिग बॉस हिंदीची हवा सर्वत्र होताना दिसतेय. अशाच घरामध्ये पुढे काय काय गोष्टी घडत जाणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi Suraj Chavan 08 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x