10 December 2024 8:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमच्याकडे सुद्धा एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आहेत मग, तुमच्या क्रेडिट स्कोरवर होणार हा परिणाम - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत आणि नियमांमध्ये मोठा बदल; ही अपडेट ठाऊक आहे का Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या Redmi Note 14 | Redmi Note 14 सिरीजची भारतात एंट्री; या तारखेपासून खरेदी करता येईल, किंमत आणि फीचर्स पाहून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO BSNL Recharge | आता केवळ 58 रुपयांपासून मिळणार BSNL चे स्वस्तात स्वस्त प्लान; मोबाईल रिचार्जसाठी लक्षात ठेवा
x

Vedanta Share Price | रॉकेट तेजीचे धावणार वेदांता शेअर, FII आणि म्युच्युअल फंड कंपन्यांकडून खरेदी, ब्रोकरेज बुलिश - Marathi News

Highlights:

  • Vedanta Share PriceNSE: VEDL – वेदांता लिमिटेड कंपनी अंश
  • वेदांता शेअर पुन्हा फोकसमध्ये
  • वेदांता सप्टेंबर तिमाही अपडेट
  • तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
  • आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्म – टार्गेट प्राईस
  • एफआयआय आणि म्युच्युअल फंडांनी वाढवली हिस्सेदारी
Vedanta Share Price

Vedanta Share Price | जगभरातील स्टॉक मार्केट्स सध्या घसरणीचा सामना करत आहेत. त्याचे पडसाद भारतीय स्टॉक मार्केटवर देखील उमटले आहेत. मागील काही दिवसांपासून BSE आणि NSE (NSE: VEDL) सातत्याने घसरत आहेत. आज म्हणजे सोमवारी स्टॉक मार्केटची सुरुवात सकारात्मक झाली, मात्र काही वेळातच शेअर बाजार पुन्हा घसरला. त्यामुळे गुंतवणूकदारांची आजही निराशा झाली. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)

वेदांता शेअर पुन्हा फोकसमध्ये
मात्र एखाद्या कंपनीबाबत सकारात्मक बातमी आल्यास तो शेअर फायद्याचा ठरू शकतो. तसेच काहीसे वेदांता शेअरबाबत घडत आहे. सोमवारी शेअर बाजाराच्या घसरणीचा परिणाम वेदांता शेअरवर झाला आणि शेअर 1.73% घसरून 499.90 रुपयांवर बंद झाला. दरम्यान, 30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाही आणि सहामाहीसाठी कंपनीबाबतच्या लेटेस्ट अपडेटमुळे वेदांता शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.48 टक्के घसरून 497.90 रुपयांवर ट्रेड करत आहे.

वेदांता सप्टेंबर तिमाही अपडेट
स्टॉक मार्केटवर लिस्टेड असलेली दिग्गज कंपनी वेदांता लिमिटेडने सप्टेंबर तिमाहीत ॲल्युमिनियम, जस्त आणि लोहखनिजाच्या उत्पादनात वाढ नोंदवल्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंदच वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे पोलाद, विदेशी धातू आणि तेल व वायूच्या उत्पादनात मात्र मोठी घट झाल्याचे आकडेवारी सांगते आहे. वेदांता लिमिटेड कंपनीने बीएसई दिलेल्या फायलिंगमध्ये नमूद केले आहे की, दुसऱ्या तिमाहीत ॲल्युमिनियमचे उत्पादन गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 3 टक्क्यांनी वाढून 6,09,000 टन झाले आहे.

वेदांता लिमिटेड कंपनीने लाभांशासंदर्भात एक्स्चेंजला फाइलिंगमध्ये माहिती देताना सांगितले होते की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 8 ऑक्टोबर (मंगळवार) रोजी होणार आहे, त्या बैठकीत आर्थिक वर्ष 2024-25 साठी इक्विटी शेअर्सवरील चौथ्या अंतरिम लाभांशाचा विचार केला जाईल आणि त्याला मंजुरी दिली जाईल.

तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
वेदांता लिमिटेड शेअर्स तेजीत येणार असल्याचे संकेत शेअर बाजार तज्ज्ञांनी दिले आहेत. वेदांता शेअरवर एकूण 8 ब्रोकरेज फर्मने BUY रेटिंग दिली आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्म – टार्गेट प्राईस
वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्ससाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने 600 रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. या शेअर्ससाठी तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. वेदांता लिमिटेड कंपनीच्या सर्व झोनमध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आर्थिक वर्ष 2026 पर्यंत तेल आणि वायूचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, वेदांता लिमिटेड कंपनीमधील वाढीच्या घटकांमुळे आगामी 3 वर्षांत कर्ज 3 अब्ज डॉलरने कमी होण्यास मदत होईल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

एफआयआय आणि म्युच्युअल फंडांनी वाढवली हिस्सेदारी
वेदांता लिमिटेड कंपनीबाबत आनंदाची बातमी म्हणजे नुकत्याच संपलेल्या तिमाहीत म्युच्युअल फंड हाउसेस आणि FII ने कंपनीमधील आपला हिस्सा वाढविला आहे. FII/FPI ने जून 2024 तिमाहीत वेदांतमधील हिस्सा 8.77% वरून 10.23% पर्यंत वाढविला आहे. तसेच म्युच्युअल फंड हाऊसेसने जून 2024 तिमाहीत वेदांता लिमिटेड कंपनीतील हिस्सा 3.55 टक्क्यांवरून 5.34 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vedanta Share Price 08 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vedanta Share Price(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x