25 January 2025 6:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह डिटेल्स जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, चॉइस इक्विटी ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Bigg Boss Marathi | उत्कर्ष शिंदेकडून गुलिगतला गाण्याची ऑफर, हे प्रसिद्ध गायक गाणार गाणं - Marathi News

Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन चांगलाच चर्चेत असल्याचा दिसतोय. बिग बॉसमधील प्रत्येक सदस्याने आपल्या खेळातून, माणुसकीतून आणि एकमेकांसाठी आपुलकी दाखवून समस्त महाराष्ट्रातील जनतेचं मन जिंकलं आहे. नुकताच भाऊचा धक्का पार पडला. यावेळेसच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी सर्व सदस्यांबरोबर धमालमस्ती करत गणेश चतुर्थीचा दिवस साजरा केला. यामध्ये काही मराठी कलाकारांमार्फत खेळ देखील खेळण्यात आले. (Suraj Chavan)

अशातच डॉक्टर आणि गीतकार उत्कर्ष शिंदे यांनी देखील बिग बॉसच्या घरामध्ये हजेरी लावली होती. खेळ आणि मनोरंजना दरम्यान उत्कर्ष यांनी आपल्या साध्या भोळ्या सुरज चव्हाणला एका गाण्याची ऑफर केली. सोबतच तुझं हे गाणं खास माझे वडील म्हणजेच ‘आनंद शिंदे’ गाणार असल्याच देखील त्याला सांगितलं. हे ऐकून सुरजला फार बरं वाटलं. घरातील सर्व सदस्यांनी टाळ्या वाजवत सुरजच कौतुक करत अभिनंदन केलं.

सुरजची परिस्थिती सर्वसामान्यांसारखी असून सुद्धा त्याने जिद्दी आणि चिकाटीमुळे बिग बॉसचं घर गाठलं. सुरजने आणखीन पुढे जाऊन आणि चांगला गेम खेळून बिग बॉसची ट्रॉफी घेऊनच घराबाहेर पडावं अशी त्याच्या फॅन्सची इच्छा आहे.

दरम्यान नुकतीच घरामध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली असून संग्राम चौगुले याने घरामध्ये प्रवेश केला आहे. पंढरीनाथ, अरबाज आणि घरातील पुरुष सदस्यांबरोबर संग्रामचं चांगलं जमेल अशी प्रतिमा पाहायला मिळत आहे.

वाइल्ड कार्ड एंट्रीला घेऊन सोशल मीडियावर अनेक चर्चा होत होत्या. वाइल्ड कार्ड एन्ट्री होऊन सुद्धा या चर्चा काही थांबल्या नाहीत. मागील सीजनसारखा घरामध्ये धिंगाणा घालायला राखी सावंत यायला हवी अशा पद्धतीचे अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

संग्राम बद्दल सांगायचं झालं तर, संग्राम हा अतिशय गाजलेला बॉडी बिल्डर आहे. त्याची बॉडी पाहून भल्याभल्यांना घाम फुटेल. संग्रामची पिळदार शरीरयष्टी असून त्याने आत्तापर्यंत बॉडी बिल्डिंगमध्ये अनेक पुरस्कार पटकावले आहेत. दरम्यान तो मूळचा कोल्हापूरचा असून डीपी दादांबरोबर त्याची चांगली गट्टी जमेल अशी आशा प्रेक्षकांनी केली आहे.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi Utkarsh Shinde offered Suraj Chavan 10 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x