Bigg Boss Marathi | वाइल्ड कार्ड सदस्य संग्रामवर प्रेक्षकांची नाराजगी "संग्राम; मोठा बैल झाला राव; ज्याच्यासाठी पाठवलं
Highlights:
- Bigg Boss Marathi
- प्रेक्षकांची संग्रामवर नाराजी :
- काय म्हणाले प्रेक्षक :

Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात सध्या कॅप्टनसी टास्कचा धूमशा पाहायला मिळतोय. दरम्यान वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आलेल्या संग्रामने पहिल्याच दिवशी स्वतःची धतिंगिरी दाखवली. परंतु संग्राम आता फुसका झाला आहे असं प्रेक्षकांना दिसून येत आहे. त्याचबरोबर मागील आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर संग्राम मिस्टर इंडिया असल्याचं रितेश यांनी सांगितलं. कारण की, संग्राम यांच्या पहिल्या दिवसानंतर त्यांचा घरामध्ये फारसा चांगला वावर दिसत नाहीये.
अशातच आता कॅप्टनसी टास्कमध्ये देखील संग्राम व्यवस्थित खेळताना दिसत नाहीये. त्यामुळे बी टीम देखील त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे. एवढंच नाही तर, सुरुवातीला अरबाजचा निषेध करणारा संग्राम त्याचीच बाजू घेत असल्याचं पाहायला मिळतंय. यावर अनेक प्रेक्षकांनी वेगवेगळे कमेंट्स करत स्वतःच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये संग्रामला चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे.
प्रेक्षकांची संग्रामवर नाराजी :
जुलै महिन्यात बिग बॉस सुरू झाल्यावर घरामध्ये दोन पहिलवानांनी एन्ट्री घेतली. एक म्हणजे अरबाज आणि दुसरा वैभव. दोघांच्या जबरदस्त एन्ट्रीमुळे हे दोघेही पहिल्या दिवसापासून एकमेकांच्या विरोधात उभे राहूनच खेळतील असा प्रेक्षकांना विश्वास होता. परंतु वैभवने अरबाजबरोबर घट्ट मैत्री करून अरबाज 2 ही हस्यास्पद पदवी मिळवली. त्यानंतर कोल्हापूरचा रांगडा गडी संग्राम याने घरात एन्ट्री घेऊन प्रेक्षकांना काहीतरी इंटरेस्टिंग पाहायला मिळेल अशी उत्सुकता निर्माण केली. परंतु ही उत्सुकता एक दिवस सुद्धा नाही टिकली. त्यामुळे प्रेक्षक संग्रामवर चांगले तापले आहेत.
View this post on Instagram
काय म्हणाले प्रेक्षक :
बिग बॉसच्या अनेक चाहत्यांनी संग्राम विरुद्ध चिडचिड व्यक्त केली आहे. यामध्ये एकजण म्हणतोय की,”संग्राम वैभव पेक्षा पण बैल निघाला, असंच खेळायचं असेल तर वैभव काय वाईट होता”. तर आणखीन एकाने म्हटलंय की,”संग्राम.. मोठा बैल झाला राव.. ज्याच्यासाठी पाठवलंय त्याच्यासोबतच खेळतो”. त्याचबरोबर “संग्राम फुसका निघाला” अशी कमेंट देखील एकाने केली आहे. यामध्ये निक्कीसह बिग बॉस आणि रितेशसाठी देखील अनेक कमेंट केल्या आहेत.
बिग बॉस शोच्या होस्टिंगवरून देखील अनेक प्रश्न उत्तर सुरू असतानाची दिसत आहेत. अनेक प्रेक्षकांना महेश मांजरेकर सरचं बिग बॉसचे होस्ट असायला हवे होते असं अजून देखील वाटत आहे. यादरम्यान केदार शिंदे यांनी देखील होस्टिंग दरम्यानचे अनेक खुलासे केले असल्याचे सोशल मीडियावरून समजत आहे.
Latest Marathi News | Bigg Boss Marathi wild card Sangram Chougule gone fail 20 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA