4 May 2025 6:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

काळजीचं कारण नाही, आता पुढे महाराष्ट्राची जनता मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीवर केलेला हा 'बेकायदेशीर कब्जा' हटवेल - सिमी गरेवाल

Bollywood Actress Simi Garewal

Actress Simi Garewal on Aaditya Thackeray’s Post | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे सोशल मीडियावरही प्रचंड चर्चा आणि टीका झाल्याचं पाहायला मिळालं. न्यायालयाने शिंदे सरकारला अप्रत्यक्ष दिलासा दिला, मात्र दुसऱ्या बाजूला स्पीकरचा प्रतोद निवडीचा निर्णय चुकीचा, प्रतोद आणि व्हीप बेकायदेशीर, राज्यपालांनी घटनेचं पालन केलं नाही असे गंभीर लिखित शेरे निकालात दिले आहेत. आमदारांच्या पात्रतेचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून त्यावर कोर्ट निकाल देणार नसून त्या निर्णयाचा अधिकार विधानसभा अध्यक्षांवर आहे, असे न्यायालयांनी म्हटले आहे. यासगळ्यात ट्विटवरुन शिंदे आणि फडणवीस यांच्यावर नेटकऱ्यांनी प्रचंड टीका केली आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील सोशल मीडियावर एक पोस्ट करत शिंदे-फडणवीस सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, ‘असंविधानिक, बेकायदा आणि अनैतिक. आजच्या निकालानंतर मिंधे भाजपा सरकारकडे बघण्याचा हा एकच मार्ग आहे.’ आदित्य यांच्या या पोस्टवर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया देत शिंदे सरकारवर टीका केली आहे. त्यात अभिनेत्री सिमी गरेवाल यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सिमी गरेवाल यांनी ‘आता जनता सर्वोच्च निकाल देईल असे म्हटले’
आदित्य ठाकरेंच्या या पोस्टवर ज्येष्ठ सिने-अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी कमेंट केली आहे. अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी कमेंटमध्ये म्हटले की, “आदित्य काळजीचे कारण नाही, आता पुढील जबाबदारी आपल्यावर आहे, महाराष्ट्राची जनता मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीवर केलेला हा बेकायदेशीर कब्जा नक्कीच हटवेल”.

Simi-Gareval

आदित्य ठाकरेंनी आभार मानले
सिमी गरेवाल यांच्या या कमेंटवर आदित्य ठाकरेंनी त्यांचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात, “आमच्या सरकारवर ताबा घेण्याआधी पूर्वीचे राज्यपाल यांची भूमिका आणि मदत ही लोकशाही आणि राज्यघटना दडपल्यासारखी होती. त्यांनी आपले कर्तव्य राज्यपाल म्हणून नाही तर एका विशिष्ट पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम पाहिले. जर यांच्यात काही नैतिकता आणि लाज तज जराशी उरली असेल तर असंवैधानिक-घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. नैतिकता आणि लोकशाही सर्वोच्च असली पाहिजे, असे आदित्य यांनी म्हटले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bollywood Actress Simi Garewal on Aaditya Thackeray Post check details on 12 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bollywood Actress Simi Garewal(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या