2 May 2025 8:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

९ सप्टेंबरला मुंबईत येतेय | कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा

Kisi Ke Baap Mein Himmat Hai Toh Rok Le, Kangana Ranaut, Back to Mumbai, Marathi News ABP Maza

मुंबई, ४ सप्टेंबर : कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे.

‘अनेकांनी मला मुंबईत परत न येण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत प्रवास करणार आहे. मुंबई एअरपोर्टला उतरण्याची वेळ मी तुम्हाला ठरली की सांगेन. कुणाच्या बापात हिम्मत अशेल तर मला रोखून दाखवा’,असं ट्विट कंगनाने केलं आहे.

मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा देणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत हिच्यावर सध्या सोशल मीडियावर टीकेचा भडिमार होत आहे. या पार्श्वभूमीवर कंगना राणौत हिने आणखी एक ट्विट करून विरोधकांवर पलटवार केला आहे. या ट्विटमध्ये कंगनाने म्हटले आहे की, तर आता सगळ्या गुंडांची तळपायाची आग मस्तकात केली आहे. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत पण त्यांच्याकडे मांडायला कोणताही तर्कशुद्ध मुद्दा नाही. त्यामुळे हे सर्वजण माझ्याविषयी आक्षेपार्ह मिम्स तयार करत असून मला नावं ठेवत आहेत.

अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं वक्तव्य केल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. कंगनाच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता टीका केली असून हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. तसंच अश व्यक्तींवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे.

 

News English Summary: I see many people are threatening me to not come back to Mumbai so I have now decided to travel to Mumbai this coming week on 9th September, I will post the time when I land at the Mumbai airport, kisi ke baap mein himmat hai toh rok le Kangana Ranaut said.

News English Title: Kisi Ke Baap Mein Himmat Hai Toh Rok Le Kangana Ranaut set to return back to Mumbai Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या