15 December 2024 5:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Mirzapur 3 | तरुणांच्या संवादात 'मिर्झापुरकी गद्दी' हा शब्द हमखास येतो, होय! मिर्झापुर 3 लवकरच प्रदर्शित होणार

Mirzapur 3

Mirzapur 3 | तरुणांच्या संवादामध्ये ‘मिर्झापुरकी गद्दी’ हा शब्द हमखास येतोच. आता हा शब्द आला कुठून तर 2018 मध्ये मिर्झापूर सीरीज आली होती. त्यावेळी ती इतकी फेमस झाली की चाहत्यांकडून याच्या पुढच्या पार्टची मागणी सोशल मीडियावर झळकू लागली. त्यानंतर 2020 मध्ये याचा 2 रा पार्ट आला आणि सस्पेन्सने दुसरा सीझन संपला. तेव्हा पासून चाहते याच्या 3 ऱ्या पार्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, लवकरच 3 रा पार्ट रिलीज करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या सीरीज मधील बिना त्रिपाठीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका दुग्गलने याबाबत अपडेट दिले आहेत. व्हिडीओ शेअर करत तिने सांगितले की, ‘मिर्झापूर 3’ चे शुटींग सुरु झाले आहे.

‘मिर्झापूर 3’ लवकरच रिलीज होणार :
अभिनेत्री रसिका दुग्गल ‘मिर्झापूर 3’ शूटिंग करत आहे. यावेळी रसिकाने म्हटले की, लखनौमधील शूटिंग नेहमीच आश्चर्यकारक असते, या शहराची ऊर्जा आणि चैतन्य उत्साहवर्धक असते. मला कायमच मिझारपूरसाठी शूट करायला उत्साह असतो. मला घरी परतल्यासारखं वाटतं. पुढे बोलताना ती म्हणाली की, ‘मिझारपूर’ सीझन 3 मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, विजय वर्मा आणि ईशा तलवार देखील आहेत आणि फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या प्रोडक्शन हाऊस, एक्सेल एंटरटेनमेंट द्वारे निर्मित असणार आहे.

कुणाची कोणती भूमिका :
दरम्यान, ‘मिर्झापूर 3’ मध्ये रसिका कलेन भैय्याच्या नवीन पत्नी आणि मुन्ना भैय्याच्या नवीन आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. या वर्षीच हा सीझन रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे. या सीझनमध्ये नवीन चेहरे पण दिसून येणार आहेत. मात्र, अध्याप सिरीजची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mirzapur 3 will release soon Checks details 8 September 2022.

हॅशटॅग्स

Mirzapur 3(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x