14 December 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Pathaan Box Office Collection | पठाण सिनेमाने 2 दिवसांत कमावले 125 कोटी, प्रेक्षकांचा राजकीय बॉयकॉट ट्रेन्डला ठेंगा

Pathaan Box Office

Pathaan Box Office Collection Day 2 | बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने भारतासह जगभरात हिंदी चित्रपटाची आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग मिळवली आहे. कमाईच्या बाबतीत पठाण या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बॉक्स ऑफिस इंडियानुसार, पठाण या चित्रपटाने या गुरुवारी प्रजासत्ताक दिनी 70 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी पठाण चित्रपटाच्या कलेक्शनच्या आकड्यात मोठी वाढ झाली. मात्र नेमकी आकडेवारी कितीतरी पटीने जास्त आहे, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. खरं तर दक्षिणेच्या सर्वच भागांत प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रजासत्ताक दिनी सिनेमागृहांमध्ये चित्रपटासाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

एका आठवड्यात २०० कोटींचे कलेक्शन अपेक्षित
‘पठाण’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ६५ ते ७० कोटी रुपयांची कमाई केली असून दोन दिवसांत या चित्रपटाने १२० कोटींहून अधिक कमाई केली आहे. शाहरुख आणि दीपिकाचा ‘पठाण’ हा चित्रपट आठवडाभरात २०० कोटींचा आकडा गाठू शकेल, अशी आशा या प्रकाशनाने व्यक्त केली आहे.

वायआरएफ बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटांना मागे टाकते
यशराज फिल्म प्रॉडक्शन हाऊसच्या (वायआरएफ) बॅनरखाली बनलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी २९.२५ कोटीची कमाई केली. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, वायआरएफ हाऊसमध्ये बनलेल्या वॉर या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी २४.३५ कोटी रुपयांची कमाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, वॉर आणि ठग्स ऑफ हिंदोस्तान या दोन्ही चित्रपटांनी हिंदी सिनेमाच्या इतिहासात मोठी ओपनिंग दिली होती, ज्याला आता शाहरुख आणि दीपिकाच्या पठाण या चित्रपटाने मागे टाकले आहे.

भारतासह जगभरात पठाण चित्रपटाच्या उत्कृष्ट कलेक्शनमुळे वायआरएफ हाऊसने गुरुवारी सर्वात मोठा ओपनिंग डे साजरा केला. या चित्रपटाने जगभरात पहिल्याच दिवशी १०६ कोटी रुपयांची कमाई केली, जी हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा विक्रम आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी पठाण या चित्रपटाने देशात ५७ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय सण असल्याने देशात अधिकृत सुट्टी होती. ज्यामुळे त्याच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली होती. आगामी काळात या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Pathaan Box Office Collection on day 2 is 125 crore rupees check details on 27 January 2023.

हॅशटॅग्स

#Pathaan Box Office(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x