20 May 2022 9:03 AM
अँप डाउनलोड

सुशांत प्रकरण | मुंबई पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण | CBI पथकाची चाचणी होणार

Corona to police officer, Investigating Sushant suicide case, CBI

मुंबई, २९ ऑगस्ट: सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात नोडल अधिकारी असलेले पोलीस उपायुक्त अभिनव त्रिमुखे यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्रिमुखे यांना भेटलेल्या सीबीआय पथकाची कोरोना चाचणी होणार आहे.

त्यामुळे इतक्या जलद गतीने सुरू असलेल्या सीबीआय तपासाचा वेग मंदावणार तर नाही अशी शंका उपस्थित झालीय. याआधी बिहारचे पोलीस अधिकारी मुंबईत सुशांत प्रकरणी तपासासाठी आले असताना त्यांना पालिकेने क्वारंटाईन केले होते. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले होते. आज सीबीआयचा सुशांत प्रकरणी तपासाचा नववा दिवस आहे.

दरम्यान, संदीप सिंहचा भाजपाशी संबंध असल्याचा आरोप काँग्रेसह काही जणांनी केला असून, त्याची चौकशी करण्याच्या मागणीनं जोर धरला आहे. यासंदर्भात तक्रारी दाखल झाल्यानंतर संदीप सिंह आणि भाजपातील संबंधांचीही सीबीआय चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी महत्त्वाची माहिती दिली.

 

News English Summary: Deputy Commissioner of Police Abhinav Trimukhe, who is the nodal officer in the Mumbai police investigation into the Sushant Singh Rajput suicide case, and his family have been infected with corona. Therefore, the CBI team that met Trimukhe will have a corona test.

News English Title: Corona to police officer who was investigating Sushant suicide The CBI team will also be tested News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x