26 May 2022 7:52 PM
अँप डाउनलोड

सुशांतसिंह प्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी | गृहमंत्रालयाने सीबीआयला निवेदन सोपवले

Complaints of BJP connection, Sushant Singh death case, Home minister Anil Deshmukh

मुंबई, २९ ऑगस्ट: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरुन राजकारण आणखी जोरात सुरु झाले आहे. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. या तक्रारीसंदर्भातलं निवेदन गृहमंत्रालयाने सीबीआयकडे दिले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तर दुसरीकडे सुशांत मृत्यूशी भाजप कनेक्शनच्या चौकशीची मागणीही काँग्रेसने लावून धरली आहे. या सगळ्याला भाजपनंही उत्तर दिले आहे.

सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात महाआघाडी सरकारवर विरोधक सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. पण आता सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी भाजपचे कनेक्शन काय, असा सवाल करत काँग्रेसने हल्लाबोल करायला सुरुवात केलीय. भाजप कनेक्शनच्या चौकशीची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांनी लावून धरली आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणातच संदीप सिंह आणि भाजपा यांच्यातील संबंधाचा नवा मुद्दा उपस्थित झाला आहे. याप्रकरणी बोलताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवणारा संदीप सिंह आणि भाजपा यांचे संबंध असून त्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. काही जणांनी तशी विनंतीही केली आहे. त्याचा संबंध बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरणाशीही आहे. त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी करण्याची विनंती मी सीबीआयकडे करणार आहे,” असं देशमुख यांनी सांगितलं.

 

News English Summary: The Home Minister has said that there were complaints of BJP connection in the case of Sushant Singh’s death. State Home Minister Anil Deshmukh has informed that the Home Ministry has given a statement regarding this complaint to the CBI. On the other hand, the Congress has also demanded an inquiry into the BJP connection with Sushant’s death. BJP has also answered all this.

News English Title: Complaints of BJP connection in Sushant Singh death case home minister Anil Deshmukh News Latest Updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x