1 May 2025 11:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Ponniyin Selvan | पोन्नियिन सेल्वन चित्रपटात ऐश्वर्या राय सोबत झळकणार शोभिता धुलिपाला, फर्स्ट लुक आउट

Ponniyin Selvan movie

Ponniyin Selvan |  बहतांश बॉलिवूड कलाकार तमिळ चित्रपटांमध्ये काम करताना दिसून येतात. अश्यातच आता बॉलीवूडमधील अभिनेत्री शोभिता धुलिपाला मणिरत्नमच्या पीरियड ड्रामा पोन्नियिन सेल्वनमध्ये दिसून येणार आहे. दरम्यान, या मणिरत्नम चित्रपटामध्ये शोभिता वनथाच्या भुमिकेमध्ये दिसून येणार आहे. दरम्यान, आगामी चित्रपटाबाबत अभिनेत्रीने तिच्या पर्सनल अकाऊंटवरून चित्रपटामधील तिचा पहिला लूक शेअर केला आहे. मेड इन हेवन या वेब सिरीजमधून शोभिता धुलिपाला प्रसिद्ध झाली.

शोभिता धुलिपालाचा नवा लुक : 
शोभिता धुलिपालाचे आत्तापर्यंत ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन ग्लॅमरस लूक पाहायला मिळाले आहेत. दरम्यान, या पोनियिन सेल्वनमधील वनथीच्या भूमिकेत शोभिता धुलिपाला अप्रतिम दिसून येत आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या मोशन पोस्टरमध्ये रॉयल लुकमध्ये दिसून येत आहे. शोभिता धुलिपालाचा पोन्नियिन सेल्वन I 30 सप्टेंबर रोजी तामिळ, हिंदी, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

चाहत्यांच्या वनाथीच्या लुकला कमेंट्स :
पोन्नियिन सेल्वन चित्रपटामधील अभिनेत्री लुक पाहून चाहते चित्रपटाबाबत खूप उत्सूक झाले आहेत. मोशन पोस्टरवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत एका चाहत्याने क्वीन आणि बेस्ट असा टॅग दिला आहे. दुसऱ्या चाहत्याने लिहीले की, ‘तेजस्वी’.

शोभिता धुलिपालाचे चित्रपट :
शोभिता पोन्नियिन सेल्वन मध्ये वनाथीच्या भुमिकेमध्ये दिसून येणार आहे. दरम्यान, शोभिताचे आगामी रमन राघव 2.0 प्रोजेक्ट, घोस्ट स्टोरीज मध्ये दिसून आली आहे. तसेच मेड इन हेवनच्या दुसऱ्या पार्टमध्ये दिसून येणार आहे. 2023 मध्ये स्ट्रीम होऊ शकतो.

पोन्नियिन सेल्वनमधील सर्वांचे लुक आऊट :
पोन्नियिन सेल्वन चित्रपटाचे निर्माते मणिरत्नम यांनी प्रकाश राजचे पात्र सुंदरा चोजर, जयचित्राचे पात्र सेंब्यान मादेवी आणि रहमानचे पात्र मधुरांतकन यांचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर रिलीज केला आहे. या चित्रपटामध्ये नंदिनीच्या भूमिकेत ऐश्वर्या राय झळकणार आहे तर आदित्य करिकलनच्या भूमिकेत विक्रम, वंथियाथेवनच्या भूमिकेत कार्ती, कुंडवईच्या भूमिकेत त्रिशा आणि अरुणमोझी वर्मनच्या भूमिकेत जयम रवी दिसून येणार आहेत. दरम्यान या चित्रपामध्ये ए आर रहमान यांची गाणी असणार आहेत तसेच यातील पहिले गाणे ए आर रहमान यांनी गायले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sobhita Dhulipala (@sobhitad)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shobhita Dhulipala first look out from Ponniyin Selvan movie Checks details 5 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Ponniyin Selvan movie(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या