12 February 2025 12:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ पोहोचला आईआरबी इन्फ्रा शेअर, पुढे तेजी येणार का - NSE: IRB RVNL Share Price | 5 महिन्यात तुफान तेजीत परतावा देणारा शेअर सातत्याने घसरतोय, पुढे काय होणार – NSE: RVNL Gold Selling Tips | घरामधील जुनं सोनं विकण्याचा विचार करताय? तत्पूर्वी ही बातमी वाचा, कदाचित विचार बदलू शकतो Jio Finance Share Price | जवळपास 36 टक्क्यांनी घसरलेला जिओ फायनान्शिअल शेअर खरेदी करावा का? अपडेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Steel Share Price | पटापट घसरतोय टाटा स्टील शेअर, गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | 100 रुपयांच्या पार जाणार हा 73 रुपयांचा पावर शेयर, की 50 रुपयांच्या खाली घसरणार? - NSE: NHPC Multibagger Mutual Fund | शेअर्स नको, या फंडाच्या स्कीममध्ये महिना 2000 रुपये बचतीवर मिळतील 2.47 कोटी रुपये
x

Jojoba Oil for Skin | सौंदर्याचा खजिना, खास औषधी गुणधर्मांनी समृद्ध जोजोबा तेल त्वचेसाठी फायदेशीर, वापरा या पद्धतीने

Jojoba Oil For Skin

Jojoba Oil for Skin |  रोजचा आहार घेताना त्यामध्ये आपल्या शरिराला मिळणारे पोषक तत्व सामिल असायला हवेत. जसेकी जोजोबा तेल वनस्पतींच्या बियांपासून बनविण्यात येते. या वनस्पतीच्या बियांमध्ये सुमारे पन्नास टक्के तेल आढळून येते. जोजोबा वनस्पती खास करून औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. जोजोबा तेलाचा वापर त्वचेसाठी व आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच वृद्धत्वाची चिन्हे कमी करून त्वचेमध्ये तेज आणण्याचे काम जोजोफा तेल करते. तुम्ही जोजोफा तेलाचा वापर मेकअप काढण्यासाठी किंवा पापण्या जाड करण्यासाठी आणि अगदी लिप बाम म्हणून वापरले तरी चालते. जोजोबा तेलाला सौंदर्याचा खजिना देखील म्हटले जाते कारण ते आपल्या सौंदर्यामध्ये भर घालण्याचे काम करते. जोजोबा तेलामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी आणि तांबे यापासून अनेक पोषक घटक असतात तसेच सौंदर्याचा खजिना म्हटल्या जाणार्‍या जोजोबा तेलापासून त्वचेला होणाऱ्या फायद्यांबद्दल आम्ही तुम्हाला काही माहिती सांगणार आहोत.

त्वचेसाठी जोजोबा तेलाचे फायदे

1. त्वचेची लवचिकता वाढते :
जोजोबा तेलामुळे त्वचेची लवचिकता वाढते तसेच यामध्ये व्हिटॅमिन ए, ई आणि ओमेगा -6 सारख्या अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. तसेच त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्याचे देखील काम करते. व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असल्यामुळे त्वचेवरील रेषा आणि सुरकुत्या टाळता येतात. जोजोबा तेल कोरड्या त्वचेपासून मुक्त होण्यासाठी उत्तम आहे तसेच जोजोबा तेल त्वचेतून बाहेर पडणाऱ्या सेबमचे संतुलन राखते, त्यामुळे त्वचा कोरडी होत नाही.

2. पुरळ दूर करते :
शरीराच्या आवश्यक नसलेल्या भागांमध्ये तेलाचे जास्त उत्पादन रोखून त्वचेला संतुलित करण्याचे काम जोजोबा तेल करते. तसेच पुरळ प्रवण त्वचेसाठी हा एक उत्तम पर्याय आहे कारण त्यात दाहक-विरोधी क्रिया असते जे त्वचेचा लालसरपणा, एक्जिमा आणि एडेमा सारखे आजार दूर करते.

3. वृद्धत्वाचा प्रभाव कमी होतो :
जोजोबा तेलाचे हायड्रेटिंग गुणधर्म वृद्धत्वाची चिन्हे टाळण्यास मदत करतात तसेच अनेक त्वचारोग आणि जखमांवर उपचार करण्यासाठीही हे तेल फायदेशीर आहे.

4. मेकअप काढण्यासाठी फायदेशीर
मेकअप रिमूव्हर म्हणून देखील जोजोबा तेलाचा उपयोग केला जातो. चेहरा धुण्यासाठीही त्याचा वापर केला जातो.

5. पापण्या जाड करा
जोजोबा तेल सौम्य असते, त्यामुळे तुम्ही त्याचा डोळ्याभोवतीही वापरू शकता. जोजोबा तेल पापण्यांचे पोषण करण्यासाठी आणि मस्करामध्ये वापण्यात येते.

6. लिप बाम म्हणून वापरा :
जोजोबा तेल लिप बाम म्हणून देखील वापरता येते. तसेच जोजोबा तेलामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स आणि झिंक भरपूर प्रमाणामध्ये आढळून येते. यामुळे ओठ मऊ राहण्यास मदत होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Jojoba Oil For Beauty Skin Checks details 28 September 2022.

हॅशटॅग्स

Jojoba Oil For Skin(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x