27 November 2022 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अजून किती तक्रारी करायच्या? पुण्यात मनसे कार्यकर्त्यांच्या तात्यांनी पक्ष सोडावा यासाठीच वरिष्ठांकडून लाबिंग? लाव्हा फुटणार? OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ?
x

Quick Makeup Tips | धकाधकीच्या आयुष्यात वेळ फार कमी मिळतो, काही मिनिटांत तयार होण्यासाठी फॉलो करा या मेकअप ट्रिक्स

Quick Makeup Tips

Quick Makeup Tips | बहुतेक महिलांना मेकअप आवडतो, त्याबद्दल कोणतीच शंका नाही. हे देखील गुपित आहे की बहुतेक महिला इंटरनेटवर मेकअप बाबतच्या टिप्स घेतात किंवा युक्त्या शोधत असतात. ते मेकअप कलाकारांचे चॅनेल आणि त्यांना फॉलो करतात जे बर्‍याचदा चांगल्या पद्धतीचा मेकअप करण्यासाठी तसेच काय चूक झाली ते सुधारण्यासाठी उपयुक्त असलेले व्हिडिओ शेअर करत असतात. जर तुम्ही देखील अशा महिलांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे!

1. चेहरा आधी स्वच्छ धुवुन घ्या.
2. मॉइश्चरायझर लावून मेकअपला सुरूवात करा, म्हणजेच आधी मॉइश्चरायझर लावा.
3. नंतर तुमच्या त्वचेच्या टोनशी जुळणारे फाउंडेशन आणि फेस पावडर चेहऱ्यावर लावून घ्या. चेहरा गोरा दिसण्यासाठी तुमच्या स्किन टोनपेक्षा फिकट फाउंडेशन लावू नका, नाहीतर तुमचा चेहरा विचित्र दिसू शकतो. तसेच तुम्ही चेहरा सुधारण्यासाठी तुम्ही फाउंडेशनच्या दोन शेड्स वापरू शकता.
4. जर तुमचा चेहरा रुंद असेल, तर चेहऱ्याच्या बाहेरील भागावर गडद शेडचे फाउंडेशन वापरा आणि तुम्हाला जे फिचर्स / भाग हायलाइट करायचे आहेत तिथे हलकी शेड वापरा.
5. हायलाइटरच्या मदतीने तुम्ही चेहरा सडपातळ बनवू शकता आणि यासाठी भुवयांच्या मध्यभागी हायलाइटर वापरा, आणि नंतर नाकावर, ओठाच्या वर आणि हनुवटीच्या मध्यभागी लावून घ्या.
6. जर तुमची हनुवटी फॅटी आणि गुबगुबीत असेल तर जबड्याच्या रेषेवर ब्राँझर लावून घ्या.
7. जर तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर डोळे हायलाइट करू नका, अन्यथा ते डोळ्यांखाली खुप वाईट पद्धतीने दिसू शकते.
8. काळ्या ऐवजी ब्राऊन आयलायनर लावा, तो तुम्हाला तरुण लूक देऊ शकतो.
9. लोअर लिडवर जास्त मस्करा लावू नका अन्यथा तुम्ही वृद्ध दिसू शकता.
10. चमकदार आयशॅडो लावू नका, ते सुरकुत्या आणि बारीक रेषा वाढवू शकतात, ज्यामुळे तुमचे वय अधिक दिसते.
11. आय प्राइमर वापरा, ते फाइन लाइन्स स्मुद करतात. यानंतर तुम्ही लाइट शेड आयशॅडो लावू शकता.
12. काजळ लावून डोळ्यांचा मेकअप पूर्ण करून घ्या.
13. डोळ्यांचा मेकअप केल्यानंतर गुलाबी, पीच अशा हलक्या शेडचे ब्लश लावून घ्या.
14. त्यानंतर शेवटी लिपस्टिक किंवा लिप ग्लॉस लावून मेकअप पूर्ण करा.
15. तरुण लूकसाठी लाइट शेडचा ओठांना मेकअप करा. गडद रंग तुम्हाला मॅच्युअर लुक देतो.
16. केस स्ट्रेट करून किंवा सॉफ्ट कर्ल्स करूनही तुम्ही तरुण दिसू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Quick Makeup Tips with latest fashion checks details 22 September 2022.

हॅशटॅग्स

Quick Makeup Tips(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x