11 December 2024 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN BEL Share Price | डिफेंस शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BEL
x

IPO Investment | बँकेत 1 वर्षात किती व्याज मिळालं असतं?, या आयपीओने 3 महिन्यात 60 टक्के परतावा दिला, म्हणून असे स्टॉक निवडा

IPO Investment

IPO Investment | तीन महिन्यांपूर्वी शेअर बाजारात IPO च्या माध्यमातून व्हिनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE वर सूचीबद्ध झाले होते. लोखंड आणि पोलाद उत्पादने, पाईप, ट्युब, बनवणाऱ्या व्हिनस कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यांत आपल्या भागधारकांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. व्हिनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनी IPO मार्फत शेअर बाजारात सूचीबद्ध झाली होती. कंपनीने आपला आयपीओ 2022 मध्ये मे महिन्यात आणला होता.

60 टक्क्यांहून अधिक नफा :
तेव्हापासून आतापर्यंत व्हिनस कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. त्याच वेळी, मागील दोन आठवड्यात व्हिनस कंपनीच्या शेअर्समध्ये 40 टक्क्यांची शानदार वाढ पाहायला मिळाली आहे. 21 सप्टेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE निर्देशांकावरवर व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्सचे शेअर्स 2 टक्के पेक्षा अधिक वाढीसह 560 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत आहेत.

व्हिनस शेअर्सची ट्रेडिंग प्राईस :
व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्सचे शेअर्स मागील 3 महिन्यांपूर्वी 326 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, सध्या शेअर 550 रुपये किमतीवर पोहोचला आहे. 21 जून 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्सचे शेअर्स 326.60 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. 21 सप्टेंबर 2022 रोजी व्हिनस कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 560 रुपयांच्या किमतीपर्यंत गेले आहेत. जर तुम्ही 3 महिन्यांपूर्वी व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.72 लाख रुपये झाले असते.

BIS मानक मिळाल्यानंतर जबरदस्त वाढ :
व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स कंपनीने जाहीर केले की कंपनीला स्टेनलेस स्टील सीमलेस, वेल्डेडसाठी भारतीय मानक ब्युरो म्हणजेच BIS अंतर्गत मान्यता मिळाली आहे, त्यानंतर शेअर्स जबरदस्त तेजीत आले. BIS कडून मान्यता मिळवणारी व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्सही पहिली भारतीय कंपनी बनली आहे. व्हीनस पाईप्सच्या शेअर्सने मार्केटमध्ये सूचीबद्ध झाल्यापासून मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 68 टक्केचा परतावा मिळवून दिला आहे. Venus Pipes & Tubes ही गुजरात स्थित कंपनी असून ‘व्हीनस” या ब्रँड नावाने विविध क्षेत्रांना आपली उत्पादने विक्री करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO Investment Vinus pipes and Tubes limited share price return on investment on 22 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x