22 September 2019 2:08 PM
अँप डाउनलोड

गेमिंग विश्वाचा नवा चषक : पी.एम.सी.ओ ग्लोबल फाईनल्स

PUBG, gaming, China berlin, esports, PUBG Game

बर्लिन : सध्या चर्चेत असणारं आणि सर्वात प्रसिद्ध असणारं ऑनलाइन गेम PUBG चे जागतिक पातळीवर खेळ बर्लिन येथे खेळण्यात आले. ह्या सामन्यांना पी.एम.सी.ओ ग्लोबल फाईनल्स असं नाव दिलं गेलं होतं. जगभरातून अनेक देशातून निवडून आलेल्या १६ टीम्स नी ह्या सामन्यांजमध्ये भाग घेतलं. मुख्य वैशिष्ठ्य म्हणजे भारतातून देखील टीमसोल नावाची एक टीम ह्या सामन्यात सहभागी झाली होती.

तीन दिवसाच्या ह्या कार्यक्रमामध्ये एकूण १६ सामने खेळले गेले. प्रत्येक सामन्यानंतर प्रत्येक टीम च्या किल्स आणि डॅमेज पॉईंट्स नुसार त्यांना गुण दिले जात होते. १६ सामन्यांच्या ह्या खेळात भारताची टीम सोल हि १२व्या स्थानकावर असून त्यांनी एकच चिकन – डिनर पटकावला. अंतिम सामन्याच्या अखेरी निकाल लागल्यावर टीम टॉप इस्पोर्ट्स हि प्रथम विजयी टीम ठरली व टीम एक्स-क्वेस्ट आणि टीम एलिट इस्पोर्ट्स ह्या द्वितीय आणि त्रितीय क्रमांकावर आल्या.

विजयी टीम म्हणजेच टीम टॉप इस्पोर्ट्स ला एकूण २५ लाख डॉलर्स चं बक्षीस देऊ करण्यात आलं. भारतातील टीम सोल हिचा पुनः भारतात आल्यावर त्यांचं PUBG फॅन्स कडून भरभरून कौतुक करण्यात आलं.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

हॅशटॅग्स

#gadgets(13)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या