3 July 2020 2:51 PM
अँप डाउनलोड

जिओ'चं नवं वादळ; जिओ गिगाफायबर

Relaince Jio, Jio, Reliance, Mukesh Ambani, Jio Internet, Jio Net, Jio Mobile, Jio Network

मुंबई : रिलायन्स इंडस्त्रीझ लिमिटेडचे चेअरमन आणि एमडी मुकेश अंबानी यांनी जिओ’ची फायबर ब्रॉडबँड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्याचे जाहीर केले. ह्या आधुनकतेला जिओ गिगाफायबर असं म्हणतात. जिओ गिगाफायबर हे फायबर-टू-होम ब्रॉडबँड सर्व्हिस आहे. सध्या गिगाफायबर केबल हि फक्त बिल्डिंग पर्यंत सीमित असून ती लोकांच्या घरापर्यंत पोहोचली नाहीये जेणे करून आजून हि लोकांना इंटरनेट स्पीड स्लोच मिळते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जिओ गिगाफायबर चं सर्वात मोठं वैशिष्ठ म्हणजे ह्या मुळे ग्राहकांस अल्ट्रा एचडी एंटरटेनमेंट, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, व्हॉइस ऍक्टिवटेड असिस्टन्स, वर्चुअल गेमिंग आणि शॉपिंग अश्या अनेक गोष्टी अगदी सहज आणि हायस्पीड करू शकतो. आपल्या एका सोशल मीडिया अकाऊंट वर लिहिताना इशा अंबानी अश्या म्हणते की, गेले ते दिवस जेव्हा इंटरनेट स्पीड MBPS मध्ये मोजायचे. आता जमाना GBPS चा येणार आहे. जिओ गिगाफायबर हे नेटवर्क देशातील लहान मोठे सर्व व्यवसाय व दुकान आणि घरा पर्यंत पोहोचणार आहे.

ह्या नेटवर्क ची पोहोच जवळ जवळ ११०० शहारांपर्यंत होणार आहे. आपल्या दुसऱ्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये इशा अंबानी असं म्हणतात की, सगळ्या घरांमध्ये एक एक WIFI असेल व सर्व यंत्र आणि प्लग पॉईंट स्मार्ट होणार. टेलिकॉम मार्केट नंतर आता जिओ ब्रॉडबँड सर्विसेस मध्ये जिओ ने आपला नाव कमवायला घेतलय. जिओ गिगाफायबर ह्याचं रजिस्ट्रेशन १५ ऑगस्ट २०१९ पासून सुरु होणार आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#gadgets(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x