2 May 2025 6:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

कोरोना संसर्ग न झालेल्या व्यक्तीलाही ब्लॅक फंगस होतो? | ब्लॅक फंगसचा मृत्युदर कोरोनापेक्षा अधिक - सविस्तर

black fungus

नवी दिल्ली, २४ मे | आता ज्या लोकांना कोविड झाला नाही अशांनाही काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ज्या लोकांच्या शरीरात ब्लड शुगर नियंत्रित नाही अशांना काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका आहे. ब्लॅक फंगस हा एक असा आजार आहे जो कोविड १९ महामारीपूर्वीही अस्तित्वात होता. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या आजाराबाबत शिकवले जाते. मधुमेह असणाऱ्या लोकांना या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. अनियंत्रित मधुमेह आणि इतर आजारांचा संसर्ग एकत्र झाल्यास काळ्या बुरशीचा धोका उद्भवू शकतो असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले आहे.

ब्लॅक फंगसवर वेळीच उपचार केला गेला नाही आणि तो शरीरात अधिक पसरला, तर त्याचा मृत्यूदर कोरोना व्हायरस संक्रमणाच्या मृत्यूदरापेक्षाही अधिक आहे, असे दिल्ली येथील AIIMSचे संचालक डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे. ते एका वृत्त वाहीनीवरील कार्यक्रमात कोरोना रुग्णांना होत असलेल्या ब्लॅक फंगससंदर्भात बोलत होते.

डॉ. रणदीप गुलेरिया पुढे म्हणाले, ज्या लोकांना शूगचा त्रास आहे, अशांनी सातत्याने आपील शुगर कंट्रोल करायला हवी. जर आपण कोरोना पॉझिटिव्ह असाल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच स्टेरॉइड घ्यायला हवे. डोकेदुखी, जी बरी होत नाही, नाकातून रक्त येणे, चेहऱ्याच्या कुठल्याही भागाला सूज येणे, अस्पष्ट दिसणे. कधी-कधी ताप येणे अथवा खोकल्यासोबत रक्त येणे हीदेखील ब्लॅक फंगसची लक्षणं आहेत.

ब्लॅक फंगसपासून किती सावध रहावे? AIIMS डायरेक्टर रणदीप गुलेरिया म्हणाले, ब्लॅक फंगसच्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळाला नाही आणि त्याला शरीरात अधिक पसरायला वेळ मिळाला, तर कोरोना व्हायरस संक्रमणाच्या तुलनेत याचा मृत्यूदर अधिक आहे. दुसऱ्या कोरोना लाटेत भीती पोटी लोकांनी अधिक स्टेरॉइड घेतले आहे. यामुळेच देशात ब्लॅकफंगसचे रुग्ण वाढले आहेत.

दरम्यान, बिहारमधील आरा जिल्ह्यात एका गावात एका 40 वर्षीय महिलेला 20 दिवसांपूर्वी ताप आला आणि ती गावातील मेडिकल स्टोरमधून औषध घेऊन बरी झाली. कोरोनाची कोणतीही तपासणी झाली नाही आणि रुग्णालयात जावे लागेल असा कोणताही त्रास झाला नाही. मात्र दोन दिवसांनंतर महिलेच्या अर्ध्या चेहऱ्यावर वेदना सुरू झाल्या. नंतर वेदना होणाऱ्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली आणि डोळा बाहेर येऊ लागला. हे प्रकरण पाहून डॉक्टर्सही चकीत झाले. शुक्रवारी महिलेचे CT स्कॅन करण्यात आले तेव्हा ब्लॅक फंगस झाल्याची पुष्टी झाली. यानंतर महिलेला पटना AIIMS मध्ये हलवण्यात आले.

 

News English Summary: Dr. Randeep Guleria further said that people who suffer from diabetes should control their sugar consistently. If you are corona positive, you should take steroids only on the advice of a doctor. Headache, which does not go away, bleeding from the nose, swelling of any part of the face, blurred vision. Occasional fever or coughing up blood is also a symptom of black fungus.

News English Title: AIIMS Dr Randeep Guleria on black fungus treatment death rate coronavirus news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या