मुंबई, १४ जुलै | साधारण पावसाची सुरुवात झाली की,कावीळ डोकं वर काढायला सुरुवात होते. पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर काविळीचे रुग्ण वाढतात. दूषित अन्न किंवा पाण्याचे सेवन केल्याने हा बाजार बळावण्याची शक्यता अधिक असते. कावीळला संस्कृतमध्ये ‘कामीण’ असे म्हणतात. त्याचा अपभ्रंश करत त्याला कावीळ असे नाव पडले. कामला या शब्दाचा अर्थ सर्व इच्छा नाहीसा करणारा आजार असा आहे. कावीळ याला ‘हिपेटायटस बी’ असे म्हणतात. कावीळ बरी होऊ शकते. त्या आधी तुम्हाला काविळीची लक्षणे, कारणे, घरगुती उपाय आणि आयुर्वेदीक उपाय यांच्याबाबत माहिती हवी. जाणून घ्या काविळीविषयी सगळे काही
कावीळ झाल्यावर यकृताचे कार्य सुरळीत चालत नाही. त्यामुळे विश्रांतीची आवश्यकता असते. अन्नपचनाच्या क्रियेत यकृताचा मोठा भाग असतो. म्हणून जेव्हा यकृताच्या कार्यात बिघाड होतो तेव्हा त्यावर अधिक ताण न येण्यासाठी योग्य ते खाणे गरजेचे आहे. काही पदार्थांमुळे यकृतावर ताण येतो आणि कावीळचा त्रास बरा होण्यास खूप वेळ लागतो. म्हणून, आयुर्वेदिक तज्ज्ञांनी हे ५ पदार्थ खाण्याचा सल्ला दिला आहे.
* गरम, तिखट पदार्थ पचण्यास जड असतात. त्यामुळे कावीळ झाल्यास ते खाणे टाळा.
* प्रोटीनचे मेटॅबॉलिझम करणे हे यकृताचे मुख्य कार्य असते. प्रोटीनयुक्त आहार घेतल्यास त्याचे मेटॅबॉलिझम करण्यासाठी यकृताला अधिक काम करावे लागते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कावीळ झाली असता शाहाकारी अन्न घेणे अधिक योग्य ठरेल.
* केक्स, पेस्ट्रीज, ब्रेड आणि कूकीज यांसारखे पदार्थ खाणे टाळा. कारण या पदार्थांमधील अतिरिक्त फॅट्समुळे यकृताच्या कार्यावर गंभीर परिणाम होऊ लागतात.
* कावीळ झाल्यास canned आणि preserved फूड घेणे टाळा, असा सल्ला डॉ. भगवती देतात. त्यात मोठ्या प्रमाणावर प्रिजर्वेटिव्हज, मीठ असते आणि या दोन्ही गोष्टी यकृताच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
* सगळेच जाणतात की, अल्कोहोल घेणे यकृताच्या आरोग्यासाठी घातक ठरते. म्हणून कावीळ झाल्यास अल्कोहोलचे सेवन टाळा.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Avoid these things during jaundice as per Ayurveda in Marathi news updates.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		